Maharashtrian Style Salad Recipe : रोज वरण-भातासह भाजी खाऊन खूप वैताग येतो. अशा वेळी आपण एक तर लोणचे-पापड घेतो, भजी किंवा विविध प्रकारच्या चटणीचा आस्वाद घेतो. पण, काही वेळा हे पदार्थ खाऊनही खूप कंटाळा येतो. मग आपल्याला काहीतरी आणखी वेगळे काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी काकडीपासून खमंग अशी चटपटीत कोशिंबीर बनवू शकता. खाण्यास चविष्ट आणि बनविण्यास अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. त्यात उन्हाळ्यात पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी ही काकडीची कोशिंबीर अगदी उत्तम आहे. काही मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ तुम्ही वरण-भात किंवा भाकरीबरोबरही अगदी सहज खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ काकडीची ही खमंग कोशिंबीर कशी करायची ते.

साहित्य

२ मध्यम आकाराच्या काकड्या
२ चमचे शेंगदाण्याचे कूट
१ हिरवी मिरची
१ चमचा पिठीसाखर
१ चमचा मीठ
अर्ध्या लिंबाचा रस
कोथिंबीर

how to make Chilled and tasty Dahi Pohe recipe
थंडगार दही पोहे, एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या सोपी रेसिपी
SaReGaMaPa Little Champs Winner singer Kartiki Gaikwad home photos
लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Mugdha Vaishampayan congrats to Kartiki Gaikwad after pregnancy announcement
कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात दोन मध्यम आकाराच्या काकड्या स्वच्छ धुऊन, त्यांच्या साली काढून, त्या किसून घ्या. त्यानंतर त्यात दोन चमचे शेंगदाण्याचे मध्यम आकारात कुटलेले कूट, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पिठीसाखर, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर मिसळून घ्या. अशा प्रकारे तयार झाली काकडीची खमंग कोशिंबीर. तुम्ही वरणभात किंवा भाकरीबरोबरही कोशिंबीर खाऊ शकता.