Ram Mandir Ayodhya : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन पार पडणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या निमित्त्याने देशात सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे.सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक शहरात, गावात, परिसरात, कॉलनीत रामभक्त एकत्र येऊन भजन किर्तन करणार आहेत. जागोजागी स्क्रीन लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दाखवला जाणार आहे. शंख वाजवला जाणार आणि आरती करुन प्रसाद वाटप केले जाईल. तुम्ही त्या दिवशी प्रभू रामासाठी खास प्रसाद बनवू शकता. अतिशय उत्तम आणि अत्यंत पौष्टिक असा गोड पदार्थ जाणून घेणार आहोत.

हा पदार्थ कसा बनवायचा, या संदर्भात युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला आपण यासाठी काय साहित्य गरजेचे आहे, ते जाणून घेऊ या.

साहित्य –

  • गव्हाचे पीठ
  • बारीक किसलेले खोबरे
  • तूप
  • जाड पोहे
  • बदाम
  • मनुके
  • काजू
  • जायफळ
  • वेलची

हेही वाचा : Kitchen Jugaad : मेथीची भाजी कडू लागते? या खास टिप्स लक्षात ठेवा, मेथीची भाजी कधीही कडू होणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती –

  • सुरुवातीला एक कढई गॅसवर ठेवा. आणि त्यात दोन चमचे साजूक तूप गरम करा.
  • त्यानंतर त्यात एक वाटीभर गव्हाचे पीठ भाजून घ्या.
  • सुगंध येईपर्यंत हे पीठ चांगले परतून घ्या.
  • त्यात किसलेले खोबरे त्यात टाका आणि पु्न्हा भाजून घ्या.
  • त्यानंतर हे मिश्रण गार होऊ द्या.
  • त्यानंतर एका दुसऱ्या कढईत अर्धी वाटी जाड पोहे घ्या आणि कुरकुरीत होण्यासाठी भाजून घ्या
  • त्यानंतर त्यात काजू, बदाम, मनुके त्यात टाका.
  • त्यानंतर गव्हाच्या पीठामध्ये बारीक वाटलेला गुळ टाका.
  • त्यानंतर हे पोह्याचे आणि ड्राय फ्रुट्सचे मिश्रणातील दोन चमचे त्यात एकत्र करा.
  • त्यानंतर सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
  • बारीक केलेल्या मिश्रणामध्ये पोह्याचे आणि ड्राय फ्रुट्सचे उरलेले मिश्रण हाताने बारीक करुन त्यात टाकावे.
  • शेवटी यात जायफळ आणि वेलची टाकावी.
  • हा रामाचा प्रसाद महिनाभर टिकतो.

Sudha’s Food Recipe या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” रामाचा प्रसाद” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अतिशय सुंदर रेसिपी”