Matar Pulao Recipe : पुलाव हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. पुलावाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. जसे की तुर डाळीचा पुलाव, काश्मीर पुलाव, नवरत्न पुलाव, पालक पुलाव, वरी तांदूळ पुलाव, शाही पुलाव, राजमा पुलाव इत्यादी. पण अनेकांना साधा मटर पुलावसुद्धा खायला खूप आवडतो. आज आम्ही तुम्हाला मटर पुलाव बनवण्याची एक हटके पद्धत सांगणार आहोत. चला तर रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
- बासमती तांदुळ
- हिरवे मटार
- कांदा
- टोमॅटो
- तूप
- कांदा
- टोमॅटो
- तेजपान
- जिरे
- लवंग
- वेलची
- गरम मसाला
- मीठ
- पाणी
हेही वाचा : Puran Poli : पुरण पोळी फुटण्याची भीती वाटते? टेन्शन घेऊ नका, या टिप्स फॉलो करा अन् नोट करा ही सोपी रेसिपी
कृती
- सुरुवातीला तांदूळ पाण्यात दोन मिनिटे भिजवून ठेवावे.
- गरम तूपात कांदा चांगला भाजा.
- त्यात नंतर लवंग, तेजपान, वेलची आणि जिरे टाका.
- त्यात मटार आणि टोमॅटो आणि गरम मसाला घाला.
- चवीनुसार मीठ टाका आणि त्यानंतर तांदुळ टाका.
- तांदळाच्या प्रमाणानुसार त्यात पाणी टाकावे.
- आणि मंद आचेवर भात शिजवावा.