Premium

हिवाळ्यात मुळ्याची भाजी कशी तयार करायची? जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी

हिवाळ्यात मुळ्याची भाजी कशी तयार करायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Mulyachi Bhaji Recipe How To Prepare Radish Vegetable In Winter
हिवाळ्यात मुळ्याची भाजी कशी तयार करायची (फोटो cookpad)

हिवाळ्यात तुम्ही रोज मुळा खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. चला तर मग पाहुयात हिवाळ्यात मुळ्याची भाजी कशी तयार करायची? याची सोपी रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुळ्याची भाजी साहित्य

  • १/२ किलो मुळा किसून किंवा बारीक कापून घ्यावा
  • १० लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्याव्या
  • १५ कडीपत्त्याची पाने
  • १/२चमचा हळद
  • चवीनुसार मीठ पाव चमचा साखर
  • चिमूटभर हिंग एक चमचा जिरे
  • २ लाल मिरच्या
  • चमचा चिली फ्लेक्स

मुळ्याची भाजी कृती

स्टेप १
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे. तेल गरम झालं की जिरं आणि हिंग कढिपत्ता घालून खमंग फोडणी करावी.

स्टेप २

त्यामध्ये लसूण आणि लाल मिरची घालून तो लालसर होऊ द्यावा.

स्टेप ३

मग त्यामध्ये किसलेला मुळा घालून तो छान परतवा. त्यामध्ये मीठ व साखर घालून वाफेवर भाजी शिजू द्यावी.

हेही वाचा >> घरीच बनवा अस्सल झणझणीत खानदेशी काळा मसाला, अर्धा किलोच्या प्रमाणात…जाणून घ्या सोपी मराठी पद्धत

स्टेप ४

शिजली की त्यामध्ये चिली फ्लेक्स घालावे व छान परतावे. दोन मिनिट वाफ येऊ द्यावी व गॅस बंद करावा. गरम गरम भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो खूप छान भाजी होती.

टीप :  हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी मुळ्याचे सेवन करू नये.  एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter srk

First published on: 01-12-2023 at 15:02 IST
Next Story
Methi Papad : मेथीचे कुरकुरीत पापड! एकदा करा अन् वर्षभर खा, नोट करा ही सोपी रेसिपी