Rava Kachori: उन्हाळ्याच्या सुट्टया सुरु असून मुलं दररोज नवनवीन पदार्थ खाण्याची मागणी करतात. अशा वेळी नवीन काय बनवावं, हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी रवा कचोरीची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि पटकन होणारी आहे. त्याशिवाय मुलांनादेखील ही नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊ या साहित्य आणि कृती…
रवा कचोरी बनविण्यासाठी साहित्य
१. २ कप रवा
२. २ कप पाणी
३. १ कप उकडलेले बटाटे
४. १/२ चमचा लाल तिखट
५. १/२ चमचा धणे पावडर
६. १/२ चमचा जिरे
७. १/४ चमचा हिंग
८. मीठ चवीनुसार
९. तेल (कचोरी तळण्यासाठी)
रवा कचोरी बनविण्याची कृती
१. सर्वांत आधी एका कढईत तेल गरम करा. त्यानंतर त्यात हिंग घालून, रवा हलका गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
२. त्यानंतर दोन कप गरम पाण्यात चवीनुसार मीठ व रवा घालून आणि हे मिश्रण मऊ होईपर्यंत मळून घ्या.
३. आता कचोरीचे सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून, ते गरम झाल्यानंतर त्यात जिरे, धणे पूड, लाल तिखट घाला.
४. या सारणात चवीनुसार मीठ आणि उकडलेले बटाटे मॅश करा.
५. या मिश्रणाला आणि चांगले मिसळून तीन-चार मिनिटे छान परतून घ्या.
६. त्यानंतर तयार केलेल्या पिठाचे लहान लहान गोळे बनवा आणि पीठ पसरून, त्यात सारण भरा, तसेच सारण भरल्यानंतर ते सर्व बाजूंनी बंद करून, त्याला कचोरीप्रमाणे गोल आकार द्या.
हेही वाचा: मुलांसाठी बनवा खास नाचणीचे पौष्टिक आप्पे; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
७. सर्व कचोर्या बनविल्यानंतर एका गरम कढईत तेल टाकून, त्यात रवा कचोरी लालसर होईपर्यंत तळा.
८. तयार गरमागरम रवा कचोरी आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.