‘मुंबई’… ‘मायानगरी’… तसं पाहिलं तर मुंबई ही कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी, त्यांच्या कुटुंबाला आपल्यात सामावून घेणारं एक शहर. पण, काळ लोटत गेला आणि या शहराची मायानगरी झाली. ही मायानगरी होत असतानाच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला ज्यांच्या अस्तित्वामुळे परिस्थितीच बदलली आणि रक्तपातही झाला. या शहराने काय नाही पाहिलं हाच प्रश्न उरलाय. गँगवॉर, बॉम्ब हल्ले, दंगल आणि शहरावर राज्य करणारे डॉन… याची साक्ष म्हणजेच मुंबई. अशा या शहराच्या इतिहासातील किंबहुना शहरातील गँगवॉरच्या इतिहासातील एक नाव म्हणजे अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’.

गँगवॉरच्या पटावरील या अतिशय महत्त्वाच्या प्याद्याच्या आयुष्यावर दिग्दर्शक अशिम अहलुवालियाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ‘डॅडी’ या चित्रपटातून केला. दगडी चाळीतून सुरु झालेला गवळीचा प्रवास अंडरवर्ल्डपर्यंत कसा जाऊन पोहोचला याची मांडणी त्याने या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या या प्रयत्नांना पूर्णपणे यश मिळालं असं म्हणता येणार नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीच गवळीच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेता अर्जुन रामपाल आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एक गोष्ट स्पष्ट केली होती. ‘डॅडी’मधून अरुण गवळीच्या व्यक्तीरेखेला उगाचच खुलवून दाखवण्यात आलं नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण, यात कुठेतरी कथानकाचा जीव गुदमरल्याचं लक्षात येतंय. गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवण्यापासून ते थेट राजकारणात प्रवेश करण्यापर्यंतचा अरुण गवळीचा प्रवास ‘डॅडी’तून दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील काही दृश्य, टाळ्या वाजवून दाद देण्याजोगे संवाद आणि अर्जुन रामपालचा अभिनय या गोष्टी उजव्या ठरत आहेत.

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

पण, गडद छटा असलेल्या ‘डॅडी’च्या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकाने अधिक रंजक करण्याचा प्रयत्नात सर्व समीकरण बिघडल्याचं लक्षात येतंय. अरुण गवळीपासून अनेकांना मदत करणाऱ्या ‘डॅडी’पर्यंतचा प्रवास अनेकांना माहिती आहे. त्या काळातील काहीजण तर या प्रवासाचे साक्षीदारही आहेत, त्यांना ‘डॅडी’ खटकू शकतो. चित्रपटातील साहसदृश्यं, गँगवॉरचा थरार, पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय, वेशभूषा या गोष्टींमध्ये बरीच मेहनत घेण्यात आलीये. ज्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे खेचले जाऊ शकतात. त्याशिवाय अर्जुन रामपालनेही ‘डॅडी’ साकारण्यासाठी शरीरयष्टीपासून आवाजाच्या पट्टीतही बदल केल्याचं पाहायला मिळतय.

‘डॅडी’मध्ये अनेकांसाठीच ‘सरप्राईज पॅकेज’ ठरतोय म्हणजे अभिनेता फरहान अख्तर. उंचावल्या ना तुमच्याही भुवया? फरहान या चित्रपटामध्ये एका ‘डॉन’च्या भूमिकेत दिसतोय. त्याच्या या भूमिकेविषयी फार काही वाच्यता करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रेक्षक त्याच्या एण्ट्रीच्या वेळी थक्क होतात. असं असलं तरीही फरहानच्या कारकिर्दीतील ही भूमिका फारशी प्रभावी नाही हेच खरं. अरुण गवळीचा प्रवास दाखवण्यात दिग्दर्शक सपशेल अपयशी ठरला नसला, तरीही मुंबईच्या गल्लीबोळात आणि गँगवॉरच्या थरारात ‘डॅडी’ हरवलाय असंच म्हणावं लागेल.