राजेश बोबडे

आज जग झपाटय़ाने बदलत आहे. प्रत्येक राष्ट्र आज उन्नति- शिखरावर अग्रेसर होण्याची धडपड करीत आहे. त्यासाठी राष्ट्रा-राष्ट्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे. भौतिक-शास्त्रात मानवांनी असाधारण प्रगति केली असून अजून त्याची भूक शांत झालेली दिसत नाही.’ – ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९५९ साली नोंदवलेली निरीक्षणे आजही प्रासंगिक आहेतच, पण महाराज पुढे जे म्हणतात ते महत्त्वाचे आहे : विज्ञानाचा मानवी जीवनावर इतका गंभीर परिणाम झाला आहे की, आज विज्ञान मनुष्याच्या ताब्यात नसून मनुष्यच विज्ञानाच्या अधीन झालेला आहे. ऐहिक सुखांच्या प्राप्तीची नाना उपकरणे विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने हस्तगत केलेली आहेत. ही सर्व धडपड कशासाठी ? तर मानव जातीला सुख लाभावे म्हणून ! परंतु हे सर्व होत असता, मनुष्यांचे जीवन सुखमय होण्याऐवजी अधिकाधिक दु:खमय व निराशामय होत आहे. आज जगात कुठेच सुख व शांती दिसत नाही. प्रत्येक राष्ट्र अभावग्रस्त स्थितीतच आपला निर्वाह करीत आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

तृप्ततेचा कुणीच ढेकर देत नसून जो तो एकमेकांवर गुरकावताना दिसतो. परस्पर कटुता, वैमनस्य यांचे थैमान सुरू आहे. शेवटी याचे पर्यवसान कशात होईल, हे सांगता येत नाही; कारण आज जागतिक स्थिती अत्यंत स्फोटक अशी आहे. जगाचे हे एक चित्र झाले. दुसरीकडे जग हे उत्तरोत्तर प्रगत होत असून मानवी मूल्यांची प्रस्थापना द्रुतगतीने होत असल्याचा निर्वाळा काही लोक देतात. जग हे समतेकडे झुकत असून निकट भविष्यात सर्व जगात सुख-समृद्धी नांदून मनुष्यजात सुखाची दिवाळी साजरी करेल, अशी आशासुद्धा व्यक्त करण्यात येते. अशाप्रकारे जगाची ही द्विधा स्थिती दृष्टिगोचर होत आहे. यावरून असे दिसून येईल की जगात दोन प्रकारचे विचार – प्रवाह सुरू आहेत. जो ज्या विचाराचा असेल तो त्याच्या विचाराप्रमाणे जगाचे भविष्य ठरवत असतो व त्यानुसार तो कार्य प्रवृत्त होत असतो. परंतु जगाची खरी वस्तुस्थिती यापेक्षा भिन्न असते. या दोन विचारांपैकी ज्या विचाराचे प्राबल्य समाजावर अधिक असते त्याच विचारानुकूल समाजरचना अस्तित्वात येत असते आणि म्हणून आम्हाला जर जग ‘सुख-संपन्न’ अवस्थेत पाहावयाचे असेल तर त्यासाठी जगाच्या मंगलतेची आम्हास जाणीव असणे आवश्यक आहे. ‘जगात सर्वत्र मंगल पाहा’-असा उपदेश आम्हाला भारतीय संत- पुरुषांनी केला, तो याचसाठी. ‘यथा दृष्टि तथा सृष्टि’ हेच खरे. याच अर्थाला धरून मी नेहमी सांगत आलो आहे की, या जगात माणसांच्या फक्त दोनच जाती आहेत : ‘मानव व दानव’ (सुष्ट आणि दुष्ट) व यांचाच कमी-अधिक प्रभाव जगावर वारंवार होत असतो.

हा भेद नष्ट होण्यासाठी महाराज आपल्या भजनात म्हणतात :

गुरुदेव ! ऐसी हो दया,

जग का अंधेरा दूर हो ।

सदधर्म-सूरज की प्रभासे,

दम्भ सारे चूर हो ।।

rajesh772@gmail.com