जगाची लोकसंख्या आठ अब्जांच्या घरात पोहोचली असताना या प्रचंड गर्दीला पुरेसे अन्नधान्य पिकवायचे तर संकर नाकारून चालणार नाही. या तंत्रातील सुरुवातीचे प्रयोग आणि आजवरच्या प्रवासाविषयी..

प्रदीप रावत

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

इसवी सन १९४४. मेक्सिको त्या काळात दुष्काळाने पछाडलेला होता. अन्नधान्याची टंचाई होती. उपजणारे गव्हाचे एकूण उत्पादन गरजेच्या फारतर निम्मे होते. हे तुटपुंजे उत्पादन कसे वाढवायचे, हा मोठा प्रश्न होता. रॉकफेलर फाऊंडेशनने त्या वर्षी एक संशोधन आणि तंत्रप्रसार प्रयोगकेंद्र सुरू केले होते. तिथे एक नॉर्मन बॉरलॉग नावाचा संशोधक होता. नवे तंत्रज्ञान शोधणे आणि ते वापरण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ही सगळी कामे तो १३ वर्षे करत होता. पारंपरिक वाणांवर अनेक रोग येत. त्यांना मिळणारी पोषणद्रव्ये तुटपुंजी असत. मेक्सिकोत येणाऱ्या रोगांचा अधिक यशस्वी प्रतिकार करणारी वाणे शोधण्यात आली.

मेक्सिकोमध्ये दिवस-रात्रीच्या हवामानात फार तफावत असे. वारे जोमदार असत. वारे आणि पावसाच्या माऱ्यामुळे पारंपरिक गव्हाची उंच आणि कमकुवत खोडाची रोपे लोळत पडत. या चिवट तरुण वैज्ञानिकाने जपानमधील गव्हाच्या बुटक्या वाणाचे निरीक्षण केले. त्याचा मेक्सिकन वाणांशी संकर केला. रोपे लोळण्याचा धोका कमी झाला. त्यात आणखी सुधारणा करणारे संकर जोपासण्यात आले. रोपागणिक फुटव्यांची संख्या वाढली. उत्पादन वाढले. एके काळी अन्नाचे दुर्भिक्ष असलेला मेक्सिको १९५६ पर्यंत अन्नाबाबत जवळपास स्वयंपूर्ण झाला.

हा लौकिक जगभर दुमदुमला. भारताची अवस्था १९६६ पर्यंत मेक्सिकोसारखीच टंचाईने ग्रासलेली होती. या परकीय जनुकी मुरडीतून उपजलेल्या वाणाच्या जादूने भारतातदेखील अन्नक्रांती झाली. बॉरलॉगचे हे नवे संकरीत वाण भारतात यशस्वीपणे पसरले. १९७४ पर्यंत भारत स्वयंपूर्ण तर झालाच त्यात भर म्हणून गव्हाचे अतिरिक्त उत्पादन घेणारा निर्यातक्षम देशही ठरला.

बॉरलॉग यांना गवसले तो अपघात नव्हता. अनेक शतके चालत आलेले डोळस प्रायोगिक शहाणपण होते. ही वानसे आणि प्राण्यांसोबत पाळीवपण जोपासण्यात लाभलेली मोलाची युक्ती होती. एका वानस प्रकाराचे पुंकेसर दुसऱ्या प्रकाराच्या बीजकोशात शिंपडायचे, त्याचे पारंपरिक नाव कृत्रिम निवडीचे तंत्र, हे युक्तीवजा तंत्र इतके फलदायी कसे होते, याचा जनुकी सुगावा बिलकूल नव्हता! फलदायी संकर घडू शकणाऱ्या दोन भिन्नरूपी जीवांची लैंगिक सरमिसळ अवगत होती. परंतु ती का कशी आणि केव्हा यशस्वी ठरते, संकरातून उपजणारे किंवा लोपणारे गुणावगुण किती ठोसपणे आणि भरघोसपणे साकारतात, अशा प्रश्नांची उत्तरे अदमासे आणि ढोबळ होती! बऱ्याचदा तंत्रज्ञान विज्ञानाच्या दोन पावले पुढे असते त्याचा हा एक नमुना! संकरामधून जे काही पदरी पडते ते पवित्र मानायचे, हवा तो गुणावगुण परिणाम मिळाला नाही तर दुसऱ्या जोडय़ांचा वापर करून पाहायचा. कृत्रिम म्हणायचे कारण काय? तर ते मानवी खटाटोपातून अवतरले. एरव्ही निसर्ग अशाच पण बव्हंशी अपघाती खटाटोपाने नवे प्रकार जन्माला घालत असतोच. प्रक्रिया तीच, तशीच, तेवढीच नैसर्गिक, फक्त माणसाच्या पुढाकाराने घडली म्हणून कृत्रिम!

अशा कृत्रिम खटाटोपाने जे नवे उपजते ते कालांतराने नैसर्गिकच वाटू लागते. आज अतोनात गाजावाजा असलेला हापूस ऊर्फ अल्फान्सो आंबा, हा अल्फान्सोच्या प्रयत्नाने साकारला. त्याला कुणी जनुकी बदलाने घडलेला म्हणून हिणवत नाही. एकेकाळी प्राथमिक रानटी गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण आजच्यापेक्षा भलते अल्प होते. भिजल्या कणकेला हवा तो लवचीकपणा देणारा गहू उपजला तो या संकरापोटी! ज्याची रोटी अधिक फोफावून फुगणारी तो हा पावाचा गहू (ब्रेड-व्हीट)! जगभर आज त्याचे अधिराज्य आहे.

आता अलीकडे लक्षात आले की ब्रेडमधील याच ग्लुटेनची घृणा असणारे मनुष्यप्राणी असतात! त्यांचे शरीर थोडय़ाश्या ग्लुटेनचादेखील तिरस्कार करते. अंगावर सूज येते. शेपूसारख्या वासाने उलटी होणारे असतात. त्यांना ‘शेपू आंबा’ विषप्राय वाटतो! ५००व र्षांपूर्वी भारतात अवतरलेला ओबडधोबड लांबट टोमॅटो नुसता खायला करकरीत आंबट असे. त्याचे आताचे अवतार निवळलेल्या आंबटपणाचे आहेत. वांग्याची विषकारी अशीच पूर्वापार ख्याती आहे. मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे हे सगळे विषारी धत्तुरा (धोतरा) कुळातील वंशज! त्याचे खानदान मुळातच विषारी! वनस्पतींच्या अंगी अनेक अशी विषवत रसायने विसावलेली असतात. कच्चे वांगे आणि बटाटे असणाऱ्या पाककृती अजूनही फार आढळत नाहीत. या फळांच्या फोडी पाण्यात भिजवूनच पाकक्रियेत वापरण्यात येतात. अन्न समजल्या जाणाऱ्या अनेक वनस्पतींमध्ये काही विषे भिन्न मात्रेने असतात. त्यातली काही अल्प असतात. काही पोटातील रसायनांना अंगवळणी पडून मंदावणारी असतात! आजचे वांगे, बटाटे, टोमॅटो, मिरच्यांसकट सर्व अन्नदायी वनस्पती माणसाने घडवलेली पाळीव रूपे आहेत. जनुकी मुरड घातल्याखेरीज हे पाळीव संकर उपजलेच नसते!

गेल्या ५० वर्षांत जनुके मुरडण्याची आणखी एक नवीन युक्ती गवसली. ती म्हणजे एका प्रकारच्या प्राण्यातील किंवा वानसांतील उपयुक्त जनुक दुसऱ्या परक्या जीवांत खुपसून प्रस्थापित करायची युक्ती. याचे अतिप्रसिद्ध उदाहरण म्हणजे बी. टी. ऊर्फ ‘बॅसिलस थुरित्जायनेसिस’ नावाचा जीवाणू. हा अनेक कीटकांना विषकारक असतो. मात्र मोठे प्राणी, पक्षी, माणसे यांना त्याची बाधा होत नाही. पूर्वी या जीवांणूची फवारणी पिकांवर करायचा प्रघात होता. पण त्या फवारणीसाठी वारंवार खर्च करावा लागे. या जिवाणूच्या देहातील हे विष आणि विषकारी परिणाम घडविणारे जनुक विलग केले आणि ते वानसाच्या देहात विसावले तर वनस्पतीच्या वाढत्या पेशींबरोबर ते जनुकदेखील वधारत जाईल, कीटकांनी वनस्पतीच्या पेशींवर करवत पाजळली तर त्यांना विषारी जनुकही अंगीकारावे लागेल आणि  त्यामुळे कीटकांचा घात होईल, अशी ही जनुकीय युक्ती! असे विषारी जनुक आत्मसात केल्याचा आर्थिक लाभ आहे का? किती आहे? हा प्रश्न आर्थिक आहे.

कपाशी, मका आणि वांगे या तीनही वनस्पतींच्या पेशी देव्हाऱ्यात या जनुकाची स्थापना झाली आहे. अनेक देशांत ही बीटीयुक्त वाणे भरपूर प्रचलित आहेत. उदा. चीनमध्ये मका आणि बांगलादेशमध्ये बीटी वांगे! अशा मका किंवा वांग्यावर अनेक अभ्यास करण्यात् आले, मात्र त्यात कोणतेही हानीकारक परिणाम आढळले नाहीत. अशी जनुकी मुरड भलतीच धोकादायक असल्याचा कांगावा जगभर सुरू आहे. खाद्याबद्दल नवीन अपरिचित गोष्टींचे भय असणे नवीन नाही! एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात बायबलमध्ये बटाटय़ाचा उल्लेख नाही म्हणून ते माणसासाठीचे अन्न नाही, असा युक्तिवाद करणारे ब्रिटनमध्ये होतेच.

भीतीचे स्तोम माजवून केलेले निसर्गवादी विचारांचे भोंगळ कीर्तन सहसा लोकाभिमुख वाटते. त्या छद्म कीर्तनात डावे उजवे असा जातिभेद नाही. मताविरोधी असणारे प्रत्येक संशोधन धनदांडग्या बहुराष्ट्रीय मंडळय़ांचे हस्तक असते. प्रत्येक संशोधन प्राथमिक व्याखेपासून गफलत करणारे असते! आठ-दहा हजार वर्षांपूर्वी जेनेटिक इंजिनीअिरग कमिटी असती तर पाववाल्या गव्हाला कधी मंजुरी मिळाली असती, याची कल्पना केलेली बरी!

आता विज्ञान-तंत्रज्ञान अधिक पुढे गेले आहे. क्रिस्पआर पद्धतीने जनुकी मुरड घालण्यासाठी अधिक सफाईदार मार्ग उपलब्ध झाले आहेत. अशा जनुकी मुरडण्याने उपजणारे नवीन वाण लाभकारक नसेल तर शेतकरी त्याला फार काळ पत्करणार नाहीत. हे सोपे उघड आर्थिक सत्य आहे. हा पर्याय चोखाळण्याचे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेता कामा नये. एका वर्गात दुसऱ्या वर्गाच्या जीवातील जनुक हे नवीन तंत्र आहे. त्याची आरोग्यविषयक पारख करता येते. त्याचीदेखील व्यवस्था जगभर उपलब्ध आहे. बॉरलॉग यांनी जनुकीय अदलाबदलाची वाट चोखाळली म्हणून जगातील अनेक देशांमध्ये भुकेचे दुष्काळी थैमान घडले नाही. खुद्द बॉरलॉग नव्या पद्धतीच्या जनुक अदलाबदलांचे समर्थक होते. तात्पर्य संकराची वाट अजमाविण्याची ही पूर्वापर रूढी अधिक सुसज्ज आहे आणि इतर ‘रूढ भयकारक’ भाकितांपेक्षा अधिक श्रेयस्कर आहे!