
डार्विनने उत्क्रांती विचार मांडल्यावर ही खीळ आणखी बळकट आणि उत्क्रांती कल्पनांची घुसमट करणारी होत गेली.
जमिनीच्या थरांत गढलेली आणि गाडली गेलेली जीवसृष्टीची पोथी मोठी श्रीमंत आहे. त्यात जीवसृष्टीमध्ये घडलेल्या कित्येक पैलूंची गाथा गोवली आहे.
पॅट्रोनिया येथे झालेल्या उत्खननामध्ये पुराजीव शास्त्राज्ञांना नऊ कोटी वर्षांपूर्वीचा अतिप्राचीन सर्पवंशी जीवाश्म सापडला.
सरपटणाऱ्या प्राण्यांमधून पक्षी उपजत घडत गेले! हे वरपांगी अविश्वसनीय वाटत असे! आणखी एक असेच स्थित्यंतर आहे.
सुमारे साडेसात कोटी ते साडेचौदा कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांमध्ये पंख दिसतात खरे, पण त्या पंखांमध्ये भरारीचे बळ नव्हते..
सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पक्षी उत्क्रांत झाले का? काही जलचर जीवांत बदल होत भूचर जीव उपजले का? अशा धर्तीची अटकळ जीवशास्त्रज्ञांनी अगोदरच…
सागरात प्लवक (प्लॅन्कटॉन) नावाचे तरंगते जीव असतात. या प्लवकांच्या थरांमुळे उत्क्रांतीने होणाऱ्या संक्रमणाचे अखंड मालिकेसारखे दर्शन घडते.
ज्यांना आता आपण आद्यजीव ( इंग्रजीमध्ये ‘प्रोकरियोट्स’) मानतो ते ‘प्रकाश संश्लेषी’ जिवाणू साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या गाळांच्या स्तरामध्ये दिसू लागतात
खडकातील स्तरांचा संपूर्ण अनुक्रम निश्चित करण्यासाठी जगातील निरनिराळ्या ठिकाणी आढळणाऱ्या खडकांच्या स्तरांचा तुलनात्मक परस्परसंबंध तपासावा लागतो.
जीवसृष्टीच्या इतिहासाच्या पहिल्या ८० टक्के कालखंडात सर्व जीवजाती मऊ शरीराच्या होत्या.