आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. काय आहे ही पद्धत?

सर्वप्रथम वाचकांचे मन:पूर्वक आभार! गेल्या पंधरा दिवसांत मला वाचकांनी इतके प्रश्न पाठवले आहेत, की त्या सर्वाची उत्तरे द्यायची तर हा स्तंभ अनेक वर्षे चालवावा लागेल. तसे करण्यापेक्षा आपण प्रश्न सोडविण्याची पद्धतच शिकून घेतली तर? एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यांपुढे कसल्या प्रतिमा येतात? चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठमोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकडय़ांची गिचमिड, पृथ्वीभोवती गरगरणारे उपग्रह, आयफोन, पांढऱ्या कोटातले रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे शास्त्रज्ञ..

What should be the format of degree education
भविष्यातील पदवी शिक्षणाचे स्वरूप कसे असावे?
article about indian psychoanalyst sudhir kakar
व्यक्तिवेध : सुधीर कक्कर
Harappan industrial settlement discovered in Rajasthan
विश्लेषण: राजस्थानात सापडली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत; पुरावे काय सांगतात?
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!

आणि मनात कुठले शब्द येतात? – न्यूटन, आइनस्टाइन, निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय..

हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे; पण विज्ञान यांच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास तर मी म्हणेन-

१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.

२  विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.

३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. (अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही.)

४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.

५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच किती तरी शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत व त्यात आपले योगदान देऊन त्याला व स्वत:ला समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी  जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.

६. विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो.

विज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते (किंवा असायला हवी). विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू – गृहीतक – ठरविणे. त्यानंतर या दोन िबदूंना सांधणारा रस्ता प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धती तपासून पाहणे व नव्याने सुरुवात करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते व तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयापासून जर आपण अंतर घेतले नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही. (वैज्ञानिक पद्धतीबद्दल आपण पुढच्या लेखात सविस्तर बोलणार आहोत.)

नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान

स्थूलमानाने विज्ञानाचे दोन भाग पडतात – नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान. काटेकोरपणे व तटस्थपणे प्रयोग व निरीक्षण करणे हे नैसर्गिक विज्ञानाच्या बाबतीत शक्य होते. त्यातील निष्कर्ष अनेकदा गणिती सूत्रांच्या साच्यात बसविता येतात, कारण निसर्गातील क्रिया-प्रक्रिया या नियमबद्ध असतात; परंतु समाज ही मानवाची निर्मिती असल्यामुळे त्याच्या रचनेत किंवा कार्यपद्धतीत काटेकोरपणा नाही, नेमकेपणा नाही. समूहाचा स्वभाव व व्यवहार यांविषयी नेमकेपणाने सांगणे कठीण असते. सामाजिक शास्त्रांमधील गृहीतके, माहिती (डेटा) संकलन व विश्लेषण यांच्या पद्धती, सिद्धांत यांच्याबद्दल सामाजिक वैज्ञानिकांत मोठय़ा प्रमाणात मतभेद आढळतात. काही प्रकारचे प्रयोग करणे सामाजिक शास्त्रात शक्य होत नाही किंवा नैतिकदृष्टय़ा ते इष्ट ठरणार नाही. उदा. समाजातील वाढत्या दहशतवादाचा लहान मुलांवर काय परिणाम होईल हा विषय अभ्यासाला चांगला आहे; पण त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी मुलांच्या एका गटाला सतत दहशतवादाच्या दडपणाखाली ठेवणे हे नैतिकतेच्या निकषात बसणार नाही. शिवाय सामाजिक वैज्ञानिकांच्या विश्लेषणाच्या कसोटय़ा वेगवेगळ्या असू शकतात. उदा. एकाच घटनेचे वर्ग, जात, लिंगभाव या वेगवेगळ्या कसोटय़ांवर केलेल्या विश्लेषणाचे निष्कर्ष अर्थातच वेगवेगळे येतील. म्हणून आपल्या अभ्यासात आपण शक्यतो नैसर्गिक विज्ञानाच्या संदर्भातच बोलू. अर्थात, आपण जेव्हा समाजाच्या भूमिकेतून विज्ञानाची समीक्षा करू, तेव्हा तो सामाजिक विज्ञानाचा भाग असेल. म्हणून त्यात मते-मतांतरे होतीलच; पण त्याचाच अर्थ हा विषय खूप ‘इंटरेस्टिंग’ आहे असा होत नाही का?

तंत्रज्ञान

उपग्रह उडविणे, स्मार्टफोन बनविणे, समुद्रतळाशी किंवा पृथ्वीच्या गाभ्यात असलेल्या खनिजांचा शोध घेणे म्हणजे विज्ञान नव्हे, ते आहे विज्ञानाचे उपयोजन, तंत्रज्ञान. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचा वारेमाप उपयोग करत असतो. मानवी संस्कृतीच्या विकासात तंत्रज्ञानाने खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. अग्नी, चाक, कोयता ते उपग्रह, टीव्ही, स्मार्टफोन ही सर्व तंत्रज्ञानाचीच कमाल! आपण तंत्रज्ञान वापरतो तेव्हा त्यामागचे विज्ञान समजून घेण्याची आपल्याला आवश्यकता नसते. आपल्याला त्याचा उपयोग करता आला की बस्स! अशीच आपली वृत्ती असते. अनेकदा तर एखाद्या गोष्टीमागे तंत्रज्ञान दडले आहे याची आपल्याला जाणीव नसते. साधे फुलका (पोळी) करण्याचे उदाहरण घ्या. छान गोलगोल, टम्म फुगलेला, उत्तम शेकलेला, पण तरीही अंगावर भाजल्याच्या खुणा न मिरविणारा फुलका बनविणे हे कौशल्याचे काम आहे. कणीक योग्यरीत्या मळणे, त्या ओल्या गोळ्याला पुरेसा ‘वाक’ असणे, तो सर्व बाजूंनी सारखा दाब देऊन लाटला जाणे, योग्य उष्णतेवर योग्य वेळ भाजला जाणे व अखेरीस गरमागरम फुलका त्याला धक्का न लावता हलकेच आगीतून डब्यात फेकणे या सर्व क्रियांसाठी आपण क्रमश: परात, पोळपाट-लाटणे, चूल/ शेगडी/ गॅस व चिमटा या उपकरणांचा वापर करत असतो. तो वापर कसा करायचा हे कळले तर आपल्यालाही असे फुलके करता येतील. (या सर्व क्रियांमागील विज्ञान तर आणखीच मनोरंजक आहे.) एकदा या गोष्टीतली गंमत आपल्याला कळली की, मग आपणही आपल्या रोजच्या समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञान निर्माण करू शकतो. ओले कपडे कमी जागेत व शरीराचा कोणताही स्नायू न लचकविता कसे वाळत घालणार यापासून तर दूरच्या शेतावरील पंप घरबसल्या कसा सुरू-बंद करणार, असे असंख्य प्रश्न आपली वाट पाहत आहेत. आपण त्यांच्या वाटेवर कधी वळणार? वैज्ञानिक हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांपुढे स्त्रीची प्रतिमा येते का? जंगल ‘वाचणारा’ आदिवासी हा पर्यावरणतज्ज्ञ आहे असे आपण मानतो का?

माझा हा लेख वाचून माझ्याच मनात हे प्रश्न उभे राहिले. तुमच्या?

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :

ravindrarp@gmail.com