आठव्या ते अकराव्या शतकातील स्कँडेनेव्हियन,  म्हणजे उत्तर युरोपातील नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, फिनलंड, डेन्मार्क या देशातील  खलाशी व्हयकिंग म्हणून ओळखल्या जायचे. हे खलाशी व्यापारी तर होतेच पण ते चांगले योद्धे आणि लुटारूही होते. ते नौका आणि  जहाजबांधणीत  तरबेज होते.   मुख्य म्हणजे  ते निíभड होते आणि कुठली ही मोहीम हाती घेण्यात ते घाबरत नसत. त्यांच्या या गुणांवरून अमेरिकेच्या १९७५ च्या मंगळ कार्यक्रमाला व्हायकिंग असे नाव देण्यात आले.
व्हायकिंग मोहीम हा तेव्हाचा सर्वात खíचक आणि महत्त्वाकांक्षी कार्यक्रम होता. यात व्हायकिंग-१ आणि व्हायकिंग-२ या  दोन यानांची उभारणी करण्यात आली होती.  दोन्ही व्हायकिंग मध्ये ऑरबायटर आणि  लँडर अशा यंत्रणा बसवण्यात आल्या होत्या. ऑरबायटर चे मुख्य कार्य मंगळाची परिक्रमा करत  मंगळाच्या पृष्ठ भागाचे चित्रण तसेच पृथ्वी ते लॅंण्डर यांच्या मध्ये दळणवळणाचा दुवा असे होते.  
व्हायकिंग  लँडर हे मंगळावर उतरून मंगळाचा अभ्यास करणार होते. ते पाठवताना पृथ्वीवरील कुठलेही सजीव (अगदी जीवाणू सुद्धा) सजीव अवस्थेत मंगळावर पोचू नयेत ही मोठी खबरदारी घेण्यात आली होती. लॅंडरचा आकार षटकोनी ठेवण्यात आला होता आणि तो पायावर उभा राहील अशी व्यवस्था होती.  संपूर्ण लॅंडरला र्निजतुक करण्याकरता या यानाला १११ अंश सेल्सियस इतक्या तापमानात ४० तास ठेवण्यात आले होते. जेव्हा ऑरबायटर आणि  लँडर यांनी पृथ्वीचे वातावरण सोडून मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू केला तेव्हा त्याच बाहेरचं आवरण सुद्धा वेगळं करून टाकण्यात आलं होतं.
व्हायकिंग-१ चे उड्डाण २० ऑगस्ट १९७५ तर व्हायकिंग-२ चे त्या नंतर लगेच ९ सप्टेंबर रोजी प्रक्षेपण करण्यात आले आणि सुमारे १० महिन्यांचा प्रवास करून व्हायकिंग-१ ने १९ जून आणि मग पाठोपाठ व्हायकिंग-२ ने ७ ऑगस्ट रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. जेव्हा त्याने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला तेव्हा  लँडर हे ऑरबायरशी जोडलेले होते. ही जोडी जवळ जवळ एक महिना मंगळाची  सुमारे ३०० कि.मी. उंची वरून परिक्रमा करत होती आणि या कालावधीत त्यांनी मंगळाची अनेक छाया चित्रे पृथ्वीकडे पाठवली. या सर्व चित्रांचा अभ्यास करून मग  लँडरला मंगळावर नेमकं कुठे उतरावायचं हा निर्णय घेण्यात आला.
लॅंडरला मंगळावर उतरवण्याचा कार्यक्रम मग चार टप्यात पूर्ण करण्यात आला. सर्वप्रथम लॅंडरला ऑरबायटरपासून वेगळे करण्यात आले. या वेळी यांची गती दर सेकंदाला ४ कि.मी. होती. काही तासांनी मग लॅंडरला मंगळाच्या दिशेने वळवण्यात आले – यातला डी-ऑर्बटि बर्न म्हणतात. आता लॅंडरला मंगळाच्या वातावरणाचा गतिरोध जाणवायला सुरवात झाली. मंगळाच्या वातावरणातील घटकाच्या घर्षणामुळे  लँडर तापून त्यातील उपकरणांना हानी पोहोचू नये म्हणून त्या भोवती एक कवच लावलेले होते.  या वेळी तापमान किती वाढतं. तसेच गती कशी कमी होते, तापमानात तसेच वातावरणाच्या दाबात आणि घनतेत कसा बदल घडतो याचे आकडे गोळा करून पृथ्वीकडे पाठवण्यात आले होते.  जेव्हा लॅंडर मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे ६कि.मी. उंचीवर होते तेव्हा त्याची गती आता दर सेंकंदाला फक्त २५० मीटर राहिली होती. या वेळी आता  लँडरचे पॅराशूट उघडण्यात आले. त्या पॅराशूटचा व्यास १६ मीटर होता. त्या नंतर ७ सेकंदांनी लॅंडरचे उर्जा कवच वेगळे करण्यात आले. आणि त्यां नंतर ८ सेकंदाने  लँडरचे तीन पाय बाहेर काढण्यात आले.
सुमारे ४५ सेकंदाच्या प्रवासा नंतर लॅंडरची गती आता सेकंदाला ६० मीटर इतकी कमी झाली होती. जेव्हा  लँडर मंगळाच्या पृष्ठ भागा पासून १.५ कि.मी. उंचीवर होते तेव्हा त्याच्या प्रवासाच्या विरूद्ध दिशेने  रॉकेट सोडून त्याची गती कमी करण्यात आली. आणि मग ४० सेकंदाने जेव्हा  लँडरने आपले पाय मंगळावर ठेवले तेव्हा त्याची गती दर संकंदाला  दर सेकंदाला २.४ मीटर होती. एखाद्या वस्तुला मंगळावर उतरण्याकरता ही गती जरी थोडी जास्त असली तरी या गतीने मंगळावर उतरवून काय तर धडक देऊन लँडर मधील उपकरणांना सुरक्षित ठेवण्याची क्षमता या लँडरच्या रचनेत होती.
व्हायकिंग-१  लँडर २० जुल तर व्हायकिंग-२   लँडर ३ जुल रोजी मंगळावर उतरलं. हे दोन्ही ऑर्बायटर मंगळाची छायाचित्र घेण्याची आणि इतर शास्त्रीय निरिक्षणे घेण्याचे काम अविरत करतच होती. व्हायकिंग-१ ने मंगळावर उतरल्या नंतर २५ सेकंदातच मंगळाची छायाचित्र घेण्यास सुरूवात केली – त्यांना ही छायाचित्रे घेण्यास ४ मिनिटे लागली. या कालावधीत त्याने आपला शक्तीशाली अँटेना कार्यान्वित केल्या. या अँटेनाच्या मदतीने आता पृथ्वीवर संदेश पाठवणे शक्य झाले. तसेच मंगळाच्या वातावरणाची निरीक्षणे घेण्याकरिता उपकरणे पण कार्यान्वित करण्यात आली. पुढच्या सात मिनिटात  लँडरने मंगळाचे ३०० अंशाचे पॅनोरॅमिक छायाचित्र पृथ्वीकडे पाठवले. त्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याने सर्वप्रथम मंगळाचे रंगीत चित्र पाठवले.
व्हायकिंग-२ मंगळावर उतरवण्याची प्रक्रिया पण व्हायकिंग-१ सारखीच होती. फक्त काही कारणामुळे त्याची गती कमी करण्याचे रॉकेट शून्य पूर्णाक चार संकंद जास्त वेळ चालू होते. त्यामुळे त्याने मंगळावर खूप धूळ उडवली आणि त्याच्या एका पाया खाली एक दगड आला आणि त्यामुळे तो ८.२ अंशाने कललेल्या स्थितीत स्थिर झाला. त्या मुळे पुढचे चार महिने त्याच्याकडून संदेश येणे अवघड झाले होते.या चारही यंत्रांनी म्हणजे दोन्ही ऑरबायटर आणि दोन्ही  लँडरनी आपल्याला मंगळाबद्दल खूप नवीन आणि पुढच्या मोहिमा आखण्यासाठी महत्त्वाचे आकडे आणि माहिती पाठवली.
व्हायकिंग-२ ऑरबायटरला त्यातील इंधन गळू लागल्यामुळे २५ जुल १९७८ रोजी (१ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांनी) बंद करण्यात आलं. त्यानंतर व्हायकिंग-२  लँडर ला ११ एप्रिल १९८० रोजी त्याची बॅटरी खराब झाल्याने बंद करण्यात आलं. व्हायकिंग-१  लँडरने ६ वर्षे ३ महिने आणि २२ दिवस काम केलं. मानवी चुकीमुळे या  लँडरचा अँटेना खाली करण्यात आला आणि त्यानंतर या लँडरशी संपर्क  २० जुल १९७६ रोजी कायमचा तुटला. व्हायकिंग-१ ऑरबायटरला १७ ऑगस्ट १९८० रोजी त्याची कक्षेत उंची स्थिर करण्यासाठीचे इंधन संपल्यामुळे बंद करण्यात  आलं.