डाइक : जेव्हा अंतर्गत भागातील लाव्हारस भूपृष्ठातील भेगांमध्ये शिरतो आणि पृष्ठभागावर न येता त्याच ठिकाणी, उभ्या भिंतीसारख्या अवस्थेत थंड होतो. त्यांना डाइक असे म्हणतात. त्यांचा आकार जाडी व लांबी अनियमित असते. ऱ्होडेशियातील एक डाइक ५०० किमी लांब व ८ किमी. रुंदीचा आहे. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यत नंदुरबार व साक्री तालुक्यात अनेक डाइक परस्परांना समांतर आढळतात.

स्टॉक : भूपृष्ठाला पडलेल्या उभ्या भेगांमध्ये अडकून लाव्हारस थंड होतो. त्याला गोलाकार उभ्या स्तंभासारखा आकार प्राप्त होतो त्याला स्टॉक असे म्हणतात. महाराष्ट्रात मनमाडजवळ असे स्टॉक आढळतात.
भूपृष्ठाअंतर्गत भागात क्षितिजसमांतर भेगा पडलेल्या असतात. लाव्हारस वर येताना त्या भेगांमध्ये शिरून तिथेच थंड होतो. त्यापासून जे आडवे खडक तयार होतात, त्यांना सील म्हणतात. या प्रकारचा खडक फारच कठीण असतो.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…

* रासायनिक गुणधर्मानुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार :
अ) आम्लधर्मीय खडक : आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत असते. अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असते. हे खडक वजनाने हलके असून त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. घट्ट लाव्हारसापासून त्याची निर्मिती होत असल्याने या खडकांची उंची जास्त, पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे.
ब) अल्कधर्मीय खडक : या प्रकारच्या अग्निजन्य खडकात ४०% सिलिका व ४०% मॅग्नेशियमचे प्रमाण असते. आयर्न ऑक्साइड व इतर पदार्थ २०% असतात. या खडकाचा रंग काळा असून त्याची झीज लवकर होते. बेसॉल्ट हे याचे उदाहरण आहे. पातळ लाव्हारसापासून हे खडक तयार होत असल्याने भूपृष्ठावर दूरवर पसरलेले असतात.

* अग्निजन्य खडकांचे गुणधर्म :
* अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात. निरनिराळ्या आकारांचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे, एकसंध झालेले असतात.
* हे खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये थर आढळत नाहीत, परंतु जोड असतात.
* या खडकांमध्ये छिद्र नसते. त्यात पाणी मुरत नाही.
* अग्निजन्य खडकांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत, परंतु अनेक प्रकारची खनिजे आढळतात.

२) स्तरित किंवा गाळाचे खडक : भूपृष्ठावर अनेक बा घटक खनन करतात. या घटकांद्वारे प्रथम अग्निजन्य खडकांची झीज होऊन झिजवलेले द्रव्य हे वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा यांद्वारे दुसरीकडे वाहून नेले जाते. शेवटी त्या पदार्थाचे संचयन समुद्रात किंवा एखाद्या जलाशयात होते. एकावर एक असे अनेक थर साचून कालांतराने त्यांचे खडक बनतात. त्यांनाच स्तरित किंवा गाळाचे खडक म्हणतात. त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात-
* निर्मितीनुसार स्तरित खडकांचे प्रकार :
१. असेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक.
२. सेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक.

* असेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक : हे खडक रासायनिक व यांत्रिक प्रक्रियेने तयार होतात. खनिजद्रव्यानुसार त्यांचे खालील उपप्रकार पडतात-
अ) वालुकाश्म : बा घटकांद्वारे झालेल्या उत्खननात जर वाळूचे प्रमाण जास्त असेल व त्यांचे जलाशयांच्या तळभागावर संचयन होऊन खडकाची निर्मिती झाली असेल तर त्यांना वाळूचे खडक म्हणतात. यात क्वार्ट्झचे प्रमाण जास्त असून त्यातील सिलिका, आयर्न ऑक्साइड, चिकणमाती व कॅल्शियमचे कण यांसारख्या पदार्थ एकमेकांना चिकटून एकसंध होतात. काँग्लोमरेट व कुरुंदाचे खडक हे वालुकाश्माचे उत्तम उदाहरण आहेत. मध्य प्रदेशात पंचमढी, विंध्य पर्वतीय क्षेत्रात व नर्मदा नदीच्या खोऱ्यात वालुकाश्म मोठय़ा प्रमाणात आढळतात.