28 February 2021

News Flash

LPU- असं भारतीय विद्यापीठ ज्यातून गुगल आणि मायक्रोसॉफ्ट निवडतं कर्मचारी

सध्या अनेक शाळा अशा आहेत ज्या कात टाकत आहेत. सध्याच्या बदलत्या काळानुरुप स्वतःला बदलत आहेत. मात्र जिथे उच्चशिक्षणाचा प्रश्न येतो तो तिथे अनेक विद्यापीठं अशी

Advertisement

सध्या अनेक शाळा अशा आहेत ज्या कात टाकत आहेत. सध्याच्या बदलत्या काळानुरुप स्वतःला बदलत आहेत. मात्र जिथे उच्चशिक्षणाचा प्रश्न येतो तो तिथे अनेक विद्यापीठं अशी आहेत ज्यामध्ये मोठे पायाभूत बदल होणं गरजेचं आहे. देशातली अनेक विद्यापीठ या बदलांच्या मानसिकतेत गेल्याचं दिसत नाही. एका बाजूला अशी विद्यापीठं आहेत ज्या अद्यापही अपग्रेड झालेल्या नाहीत. मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अशी काही खासगी विद्यापीठं आहेत जी काळानुरुप बदलली आहेत अपग्रेड झाली आहेत. शैक्षणिक दर्जा, intuitive learning आणि इंडस्ट्री ट्रेनिंग देण्याचं काम या विद्यापीठांमधून केलं जातं. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे घडवलं जातं की या विद्यापीठांमधून गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या नामांकित कंपन्या त्यांचे कर्मचारी निवडतात

अशाच काही विद्यापीठांमधलं एक विद्यापीठ आहे ज्याचं नाव आहे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. शैक्षणिक दर्जा आणि काळानुरुप बदल करत इंडस्ट्री ट्रेनिंग इथे दिलं जातं. या विद्यापीठाची सुरुवात २००५ मध्ये झाली. ही भारतातली सर्वात मोठी सिंगल कॅम्पस युनिव्हर्सिटी आहे. उत्तम दर्जाचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. या विद्यापीठातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधीही बड्या कंपन्यांमध्ये मिळते.

प्रत्येक वर्षी LPU मधून बाहेर पडणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना अॅमेझॉन, सॅप, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, सिस्को, डेल यांसारख्या कंपन्या जॉब ऑफर देतात. यातले अनेक जण निवडलेही जातात.

LPU ची विद्यार्थिनी असलेल्या तनया अरोराचा हा अनुभव ऐका. मायक्रोसॉफ्टने तिची निवड त्यांच्या कंपनीत केली आहे. तिला वर्षाला ४२ लाखांचं पॅकेज ऑफर करण्यात आलं आहे. २०१९ मध्ये या विद्यापीठातून निवडलेल्या गेलेल्या विद्यार्थिनीला हायेस्ट पॅकेज देण्यात आलं आहे

 

 

LPU इंडस्ट्रीतल्या बड्या कंपन्यांसाठी का महत्त्वाची?

या विद्यापीठातून उतीर्ण झालेले विद्यार्थी हे फक्त पदवी घेऊनच बाहेर पडत नाहीत, फक्त शिक्षणात तरबेज आणि हुशार नसतात तर इंडस्ट्रीत काम करु शकतील या स्तराचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. त्यामुळेच LPU तल्या विद्यार्थ्यांना बड्या कंपन्या प्राधान्य देतात. कामासाठी तयार असणं, इंडस्ट्रीचं संपूर्ण ज्ञान आणि योग्य वैचारिक क्षमता या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये कायम आढळते असं बड्या कंपन्यांचं म्हणणं आहे.

आता, LPU विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीसाठी कसं तयार करते त्याविषयी थोडं..

 

 

पायाभूत सेवा

LPU मध्ये शिक्षण घेणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या क्लासरुममधून इंडस्ट्रीचं ज्ञान दिलं जातं. LPU iMac लॅब, प्रॅक्टीकल या सगळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण दिलं जातं. LPU मध्ये on campus मॉलही चालवला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना बिझनेस आयडिया येते.

याशिवाय LPU मध्ये एक मोठा स्पोर्ट्स विभाग आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकला असतो तसा स्विमिंग पूल आहे. तसेच यामध्ये एक रुग्णालयही आहे. ६ मजल्यांचे अद्ययावत वाचनालयही आहे. मॉडर्न क्लासरुम्स, ऑडिटोरियम्स ही देखील LPU ची खास वैशिष्ट्यं आहेत.

 

LPU मध्ये ५० देशांमधील साधारण ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच भारतातल्याही विविध भागातले विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात. जगातल्या अनेक देशांमधले विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांची संस्कृती आणि तिथल्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होते.

शिक्षणाबद्दल थोडेसे

शिक्षकया विद्यापीठात शिकवणारे शिक्षक हे इंडस्ट्रीचा दीर्घ अनुभव असलेले आहेत. तसेच प्रत्यक्ष इंडस्ट्रीकडून काही तज्ज्ञ मंडळी येतात जी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

Live Projects : सोलार कारची निर्मिती कशी करायची? तसंच एक हॉटेल कसं व्यवस्थित चालवायचं? (हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर ठरतं) प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येतो त्यामुळे काम करणं त्यांना पुढे सोपं जातं.

इंडस्ट्रीचा अनुभव: LPU त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ पर्यायी किंवा सक्तीच्या इंटर्नशिप्स आयोजित करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की कसं काम केलं जातं याचा अनुभव घेता येतो

गेस्ट लेक्चर्स आणि वर्कशॉप्स

LPU मध्ये विविध प्रकारची गेस्ट लेक्चर्सही घेतली जातात. ज्यामध्ये इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तज्ञ्ज मंडळींचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळतं. तसेच विविध प्रकारचे वर्कशॉप्सही राबवले जातात. त्यामुळेही विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध शिक्षण मिळतं.

शैक्षणिक वर्षातला विद्यार्थ्यांचा अनुभव कसा असतो तुम्हीच ऐका

 

प्लेसमेंट आणि वर्कशॉप्स

LPU चे विद्यार्थी ज्या प्रकारे परफॉर्म करतात त्यावरच त्यांना जॉब मिळणं अवलंबून असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील अशा प्रकारचं ट्रेनिंगही दिलं जातंच. शिवाय इंटरव्ह्यूच्या दरम्यान काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? त्यांना कशी उत्तरं द्यायची? याचंही प्रशिक्षण दिलं जातं.

अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गूगल अशा कंपन्या दरवर्षी LPU मध्ये प्लेसमेंट राऊंड्स घेतात. ज्यातून अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या जॉब ऑफर मिळतात. Qualcomm सारख्या कंपनीतीही LPU च्या काही विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. LPU कडे असलेल्या नोंदीप्रमाणे ११० कंपन्या अशा आहेत ज्या या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जॉब देतात. IIT, IIM च्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे जॉब ऑफर केला जातो अगदी तशीच ऑफर ही LPU च्या विद्यार्थ्यांनाही दिली जाते.

LPU ने काळानुरुप शिक्षणपद्धतीत बदलही केले आहेत. विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञान कसं मिळेल, इंडस्ट्रीत काम करण्यासाठी त्यांची कौशल्यं कशी विकसित होतील यासाठी LPU काम करते. त्यामुळेच अॅपल, गूगलसारख्या नामांकित कंपन्या LPU च्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर देतात.

सध्या करोनाचं संकट देशावर आणि जगावर आहे. अशात अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला आहे की आपल्याला LPU मध्ये प्रवेश कसा घेता येईल? त्यामुळेच LPU ने हा निर्णय घेतला आहे की यावर्षीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडेल. तुम्ही प्रवेश करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता. तसेच फोन आणि लॅपटॉपद्वारेही कनेक्ट होऊन प्रवेशासाठी अर्ज करु शकता. LPUNEST द्वारे घरी बसूनच तुम्ही प्रवेश परीक्षाही देऊ शकता असंही LPU ने म्हटलं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ येते आहे. तेव्हा त्वरा करा.

अधिक माहितीसाठी आणि LPU च्या प्रवेश प्रक्रियेसाठी  http://www.lpu.in  या वेबसाइटला भेट द्या किंवा फोन करा 1800 102 4057 या क्रमांकावर. तुम्ही What’s App द्वारेही आम्हाला संपर्क साधू शकता. त्यासाठीचा क्रमांक आहे 09876022222

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 2:56 pm

Web Title: the indian university from where google and microsoft hire
Just Now!
X