चंदिगढ : फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर श्रीलंकेच्या महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात आर्यलडवर १४ धावांनी विजय मिळवला.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १२९ धावांची मजल मारली. चामरी अट्टापटू जयांगिनी (३४), प्रसादिनी वीराकोड्डी (३२) आणि इशानी कौशल्या (३५) या तिघींच्या संयमी खेळींच्या जोरावर श्रीलंकेने समाधानकारक धावसंख्या नोंदवली. अन्य सहा फलंदाजांना एकेरी आकडाही गाठता आला नाही. आर्यलडतर्फे सिआरा मेटाकाल्फने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्यलडच्या संघाला ११५ धावाच करता आल्या. सेसिलिआ जॉयस आणि लौरा डिनली यांनी प्रत्येकी २९ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे सुगंदिका कुमारीने ३ बळी घेतले. सिआराला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.