Apple ही एक टेक कंपनी आहे. ही कंपनी आयफोन, लॅपटॉप , मॅकबुक आणि अन्य प्रॉडक्ट्स तयार करते. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. आता सुद्धा असेच फीचर अ‍ॅपल कंपनीने आणले आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या अयोनीद्वारे पाठवलेले मेसेज एडिट आणि पूर्ववत करू शकता. हे फिचर गेल्यावर्षी iOS 16 लाँच करण्यात आले होते. अ‍ॅपलच्या सपोर्ट पेजनुसार आयफोनवरील मेसेज एडिट करण्यासाठी किंवा पूर्ववत करण्यासाठी iOS 16, iPadOS 16.1, macOS Ventura किंवा यानंतरच्या मॉडेलवर iMessage वापरणे आवश्यक आहे. Apple डिव्हाइस वापरून एखाद्याला मेसेज डिलीट किंवा एडिट केल्यास ज्याला मेसेज केला तो अजूनही जुना मेसेज वाचू शकतो. आयफोनवर पाठवलेला मेसेज पूर्ववत किंवा एडिट कसा करायचा , त्यासाठी काय प्रक्रिया आहेत ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : फ्रान्स युनिव्हर्सिटीने ChatGpt वर घातली बंदी, म्हणाले याचा वापर करणाऱ्यांना…

undo a sent message on iPhone

Step-1. तुमच्या आयफोनमधील मेसेजेसमध्ये जाऊन चॅटवर क्लिक करा.

Step-2. त्यानंतर तुम्हाला जो मेसेज पाठवायचा असेल त्यावर क्लीक करा आणि थोडावेळ प्रेस करून ठेवा.

Step-3. त्यानंतर undo वेळ क्लीक करा . तसेच या चॅटमधून मेसेज डिलीट होईल.

हेही वाचा : Google Layoffs: Google ने कामावरून काढून टाकताच महिला झाली भावूक; म्हणाली, “बॉसला फोन केला अन्…”

undo a edit message on iPhone

Step-1. पहिल्यांदा मेसेजेस ओपन करा आणि चॅटवॉर क्लिक करा.

Step-2. जो मेसेज तुम्हाला एडिट करायचा आहे त्या मेसेजला टच करा आणि प्रेस करून ठेवा.

Step-3. यानंतर एडिट बटणावर क्लिक करा. येथे तुमचे मेसेज एडिट करा आणि नंतर मेसेज फायनल करण्यासाठी चेकमार्कवर क्लिक करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही एडिट करत असलेल्या मेसेजखाली एडिट हा पर्याय दिसतो याची नोंद घ्यावी. एडिट हिस्ट्री पाहण्यासाठी कोणीही एडिट या शब्दावर सिसिलिक करू शकता. अ‍ॅपलचे म्हणणे आहे की वापरकर्त्याने मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांत पाच वेळा एडिट करू शकतो.