भारती एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमाकांची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ नंतर एअरटेलने देशात आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. एअरटेलकडे असे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत ज्यामध्ये वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतात. सध्या भारतात आयसीसी पुरुष वर्ल्ड कप स्पर्धा २०२३ सुरु झाली आहे. एअरटेलने देखील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी काही प्लॅन्स लॉन्च केले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेचा आनंद घेता यावा म्हणून एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांसाठी कोणकोणते रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

एअरटेलचा ४९ रुपयांचा डेटा पॅक

एअरटेलच्या ४९ रुपयांच्या डेटा पॅकमध्ये वापरकर्त्यांना ६ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. या प्लॅनची वैधता एक दिवस असणार आहे. म्हणजेच १ जीबी डेटासाठी तुम्हाला अंदाजे ८ रुपये मोजावे लागणार आहेत. जर का तुम्ही प्रवासात असाल किंवा वाय फाय नसलेल्या भागात तुम्ही असल्यास हा प्लॅन तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : iPhone च्या ‘या’ मॉडेलवर मिळतोय तब्बल २५,६०० रूपयांचा डिस्काउंट, Flipkart वर सुरू आहे बेस्ट डील

एअरटेलचा ९९ रुपयांचा डेटा पॅक

जर का तुम्हाला २ दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड डेटाच्या शोधत असाल तर एअरटेलने ९९ रुपयांचा एक अनलिमिटेड डेटा पॅक सादर केला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्ते कोणत्याही अडचणीशिवाय सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. यात अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच यात एकूण दोन दिवसांसाठी ४० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्रत्येक दिवशी २० जीबी डेटा तुम्हाला वापरता येणार आहे.

एअरटेलचा १८१ रुपयांचा डेटा पॅक

आयसीसी वर्ल्ड स्पर्धा पाहण्यासाठी तुम्हाला एअरटेलचा १८१ रुपयांचा प्लॅन देखील फायदेशीर ठरेल. ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा महिना आहे. जर का प्रवासादरम्यान तुम्हाला अतिरिक्त डेटाची आवश्यकता असेल तर तुम्ही हा प्लॅन निवडू शकता. हा प्लॅन तुमच्या बेस प्लॅनव्यतिरिक्त दररोज १जीबी डेटा ऑफर करते.

हेही वाचा : VIDEO: भारतात लवकरच OnePlus लॉन्च करणार आपला ‘हा’ पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, टिझर एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअरटेलचा ३०१ रुपयांचा डेटा पॅक

या लिस्टमधील शेवटचा प्लॅन हा ३०१ रुपयांचा आहे. जर का तुमच्या घरी वायफाय असेल तर तुम्हाला अतिरिक्त डेटाची अव्ह्सयक्त लागू शकते. हा प्लॅन तुमचे बेस प्लॅनशिवाय अतिरिक्त ५० जीबी डेटा ऑफर करतो. तसेच तुम्हाला या प्लॅनमध्ये विंक म्युझिक सबस्क्रिप्शनसह येतात.