सध्या अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू आहे. प्राइम मेंबरशिप असणाऱ्यांना ७ तारखेपासूनच या सेलमध्ये प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये खरेदीदारांना अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि अन्य प्रॉडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळत आहेत. तसेच या सेल दरम्यान, अ‍ॅपल, सॅमसंग, वनप्लस , रिअलमी आणि अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप , टीव्हीवर डिस्काउंट ऑफर्स देत आहे. आज आपण अशाच काही गॅजेट्सवरील डील्स पाहणार आहोत.

OnePlus 11 5G

वनप्लस ११ ५जी स्मार्टफोन ५६,९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. सध्या या फोनवर खरेदीदारांना सेलमध्ये डिस्काउंट मिळत आहे. खरेदीदार स्मार्टफोनच्या खरेदीवर ४ हजारांचे अ‍ॅमेझॉन कूपन आणि एसबीआय बँकेच्या कार्डवर २,२५० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळवू शकतात. या डीलमध्ये ग्राहकांना ३,९९९ रुपयांचे वनप्लस बड्स Z2 TWS देखील मोफत मिळतील. तसेच खरेदीदारांना अ‍ॅमेझॉन वर ५० हजारांपार्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

why Horlicks remove healthy label
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच

अ‍ॅपल iPad Air 2022

अ‍ॅपल आयपॅड एअर २०२२ भारतात ५४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते. आता आयपॅड एअर २०२२ ला अ‍ॅमेझॉनवर ४७,९९८ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. खरेदीदारांना एसबीआय बँकेच्या कार्डवर ५ हजारांचा झटपट डिस्काउंट मिळेल. याशिवाय खरेदीदार आपल्या जुन्या डिव्हाइसवर ४५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसचा लाभ देखील मिळवू शकतात.

सॅमसंग Galaxy S23 5G

सॅमसंग गॅलॅक्सी S23 5G हा स्मार्टफोन सध्या ६९,९९९ रुपये किंमतीमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये एसबीआय बँकेच्या कार्डवर ५ हजारांची झटपट सूट मिळणार आहे. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात ७४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. खरेदीदार आपल्या जुन्या स्मार्टफोनवर ५५ हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळवू शकतात.

हेही वाचा : केवळ ११,६९९ रूपयांमध्ये सॅमसंग Galaxy Z Flip 3 खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय डिस्काउंट

सॅमसंग Galaxy Z Flip 4 5G

सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip4 हा फोल्डेबल स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर ७९,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. खरेदीदारांना या फोनच्या खरेदीवर ८,५०० रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय एसबीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने व्यवहार केल्यास ७ हजारांचा झटपट डिस्काउंट देखील मिळवू शकतात. यामुळे या फोनची किंमत ६४,४९९ रुपये इतकी होईल. खरेदीदारांना त्यांच्या जुन्या स्मार्टफोनवर ५० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो.