Apple ने दोन वर्षांनी आपला दुसरा सेकंड जनरेशनचा होम होमपॉड स्मार्ट स्पीकर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ३ फेब्रुवारीपासून भारतात हा स्पीकर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये नवीन डिझाईन अणि चांगल्या साउंड क्वालिटीचा वापर करण्यात आला आहे.

Apple HomePod 2 याच्या साउंड क्वालिटीमध्ये एक स्पेशल वूफर बसवण्यात आला आहे. यामध्ये अ‍ॅपल एस ७ प्रोसेसर आणि इनबिल्ट सेन्सर्स आणि EQ मायक्रोफोन आहे. या नवीन स्पीकरबद्दल कंपनीचे असे म्हणणे आहे की, हे आवाज ओळखण्यास सक्षम आहे. हा स्पीकर तुमच्या खोलीतील आवाज त्याच्या स्थितीनुसार सामावून घेऊ शकतो.

Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

हेही वाचा : मोठी बातमी! OnePlus Nord CE 3चे फीचर्स झाले लीक, इतक्या मेगापिक्सलचा असणार कॅमेरा

Apple HomePod 2 चे बाहेरील भाग जाळीसारखे असून ते १०० टक्के फॅब्रिक आहे. Apple TV ला हा स्पीकर कनेक्ट करता येतो. या स्पीकर ला व्हॉइस कमांडने नियंत्रित केले जाऊ शकते. होमपॉड या स्पीकरचा उपयोग मेसेज पाठवण्यासाठीसुद्धा होतो. Apple HomePod 2 हा स्पीकर धूर आणि कार्बन मोनोऑक्साइड ओळखू शकतो. हा स्पीकर आग लागल्यास युजर्सला मेसेज देतो. तसेच यात तापमान मोजता येते. यात ह्युमिडीटी सेंसर्ड देखील आहेत.

किती आहे किंमत ?

Apple HomePod 2 हे स्पीकर पांढऱ्या आणि नवीन मिडनाईट या रंगांमध्ये युजर्सना खरेदी करता येणार आहे. तीन फेब्रुवारीपासून या स्पीकरची विक्री भारतात सुरु होणार आहे. या स्पीकरची किंमत ३२,९०० रुपये असणार आहे. Apple Store वर याचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे.