ipad pro 2022 launch : अलिकडेच अ‍ॅपलने आयफोन १४ सिरीज लाँच केली होती. दमदार फीचरमुळे या फोनला प्रचंड मागणी दिसून येत आहे. तर १४ आल्यानंतर त्या खालील १३, १२ आणि इतर सिरीजच्या फोनची किंमत घटल्याने ग्राहकांचा कल या फोन खरेदीकडे देखील दिसून येत आहे. यावरून अ‍ॅपल फोनला किती मागणी आहे, याचा अंदाज येतो. आयफोन १४ च्या लाँच नंतर आयपॅडबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर अ‍ॅपलने बजारात आपले नवे उत्पादन सादर केले आहे. अ‍ॅपलने आय पॅड २०२२ आणि आयपॅड प्रो २०२२ लाँच केले आहे.

अ‍ॅपले नवा आणि अपडेटेड आयपॅड प्रो गतिमान एम २ चिपसेटसह लाँच केला आहे. हा आयपॅड २६ ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच अ‍ॅपले नवा आयपॅड २०२२ देखील लाँच केला आहे. हा फोन नवे रंग पर्यायांसह उपलब्ध होणार आहे. पॅडमध्ये काही आंतरिक बदल करण्यात आले आहेत.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’

(काय आहे हॅशटॅग? इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यासाठी ‘असा’ करा वापर)

ही आहे अ‍ॅपल प्रो २०२२ ची किंमत

अ‍ॅपलचे हे टॅबलेट दोन आकारात येतात. एक ११ इंचचा आहे, तर दुसरा १२.९ इंचचा आहे. दोन्ही टॅबलेटच्या डिजाइनमध्ये कुठलाही बदल नाही. केवळ होम बटन हटवण्यात आले आहे. पूर्वीच्या आयपॅड प्रमाणेच १२.९ इंच आयपॅड प्रो हा मिनी एलईडी डिस्प्ले पॅनलसह येतो. याने कॉन्ट्रास्ट चांगले मिळते. तर ११ इंचच्या आयपॅडमध्ये सामान्य एलसीडी डिस्प्ले मिळते. पण दोन्ही मॉडेलमध्ये १२० हर्ट्झ प्रो मोशन रिफ्रेश रेट मिळतो.

नवीन आय पॅड अ‍ॅपल पेन्सिलसोबत सुसंगतपणे काम करतो. यामध्ये एक होवर फीचर मिळते. या फीचरमध्ये पेन्सिल पॅडच्या स्क्रिनला स्पर्श न होता केवळ त्यावरून फिरत असतनाही पॅडमध्ये क्रिया घडवू शकते. हे फीचर स्केच करणाऱ्यांना फायद्याचे ठरेल, असे अ‍ॅपलच म्हणणे आहे. स्केच काढण्याची आवड असणाऱ्या मुलांना हा फीचर फायद्याचे ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे, या नव्या आयपॅड प्रो मॉडेल्समध्ये तुम्हाला ५ जी सपोर्ट आणि वायफाय ६ ई मिळत आहे. ५ जीने टॅबवर वेगवान इटरनेट वापरण्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल.

(आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एडिट करता येईल मेसेज, लवकरच मिळणार ‘हे’ ५ भन्नाट फीचर)

कालपासून (१८ ऑक्टोबर) नव्या आयपॅड प्रोसाठी ऑर्डर घ्यायला सुरुवात झालेली आहे. apple.com/store आणि अ‍ॅपल स्टोअर अ‍ॅपवर तुम्ही ऑर्डर करू शकता. पॅड २६ ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील. आयपॅड प्रो ११ इंचची किंमत ८१ हजार ९०० रुपये आहे. तर आयपॅड प्रो १२.९ इंचची किंमत १ लाख १२ हजार ९०० रुपये आहे. स्पेस ग्रे, सिल्वर या रंगांमध्ये ते उपलब्ध आहेत. २ टीबी स्टोअरेज पर्यंत हे टॅब मिळत आहेत, पण बेस व्हेरिएंट १२८ जीबी स्टोअरेज पर्यंतच मिळत आहे.

४४ हजार ९०० रुपयांमध्ये मिळतोय आयपॅड २०२२

अ‍ॅपलने आयपॅड २०२२ देखील लाँच केला आहे. वायफायसह पॅडची किंमत ४४ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते, तर सेल्युलर मॉडेल हा ५९ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पॅड निळा, गुलाबी, पिवळा आणि चांदी रंगात उपलब्ध आहे. पॅडमध्ये ए १४ बायोनिक चिपसेट मिळते आणि त्यास १०.९ इंचचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. पॅडला होम बटन नाही, परंतु सुरक्षेसाठी त्यात टच आयडी मिळत आहे. फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. पॅडच्या मागील भागात ४ के रेकॉर्डिंग सपोर्टसह १२ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. तर पुढेही १२ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आहे.

(झुकरबर्ग यांनी प्रायव्हसीवरून अ‍ॅपलला डिवचले, ‘या’ जाहिरातीतून केली थेट टीका, व्हॉट्सअ‍ॅपच बेस्ट असल्याचे सांगितले)

सेल्युलर मॉडेलमध्ये वायफाय ६ सपोर्ट आणि ५ जी मिळत आहे. दिवसभर बॅटरी पुरेल, असा अ‍ॅपलचा दावा आहे. चार्जिंगसाठी यूएसबी टाईप सी सपोर्ट देण्यात आले आहे. टॅबला नवीन मॅजिक किबोर्ड फोलिओ जोडता येते. मॅजिक कीबोर्ड फोलिओ आयपॅडला चुंबकीयरित्या जुळते. त्यास चार्जिंगची आवश्यकता नाही. पॅड अ‍ॅपल पेन्सिलला देखील सपोर्ट करतो.