आयफोन हा जगातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आयफोनला (iPhone) मोठी मागणी देखील आहे. जबरदस्त लूक, स्पेसिफिकेशन्स, सिक्युरिटी फीचर्समुळे ॲप्पल आयफोनची किंमत देखील तेवढीच महाग आहे. त्यामुळे पैशांअभावी अनेक जण हा महागडा स्मार्टफोन खरेदी करु शकत नाहीत. परंतु आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Apple iPhone 12 वर जबरदस्त ऑफर दिली जात आहे.जर का तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी iPhone 12 हा एक चांगला पर्याय आहे. कारण Flipkart वर एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही या फोनवर तब्बल २५,००० रुपयांची बचत करू शकता.

Apple च्या iPhone 12 च्या ६४ जीबी सस्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ५९,९०० रुपये इतकी आहे. मात्र ९ टक्क्यांची सूट मिळाल्यावर हा फोन Flipkart वर ५३,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच या फोनवर तुम्हाला आणखी एक ऑफर देण्यात येत आहे.

हेही वाचा : ग्राहकांसाठी खुशखबर! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल १८ हजारांची भरघोस सूट, जाणून घ्या ऑफर्स

iPhone 12 वर ग्राहकांना २०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर का तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून हा फोन खरेदी केला तर तुम्ही iPhone 12 स्वस्तात खरेदी करू शकता. जुना मोबाईल फोन चांगल्या स्थितीत असेल तेव्हाच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळेल. याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट दिली जात आहे. म्हणजेच नवीन आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली डील आहे.

आयफोन 12 च्या फीचरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला यामध्ये १२ मेगापिक्सलचे २ कॅमेरे आणि सेल्फीसाठी देखील १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा मोबाईल फोन ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. हा स्मार्टफोन तुम्ही ६ रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.