Apple ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन आणि अन्य उपकरण वापरण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. Apple भारतीय बाजारपेठमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. Apple उत्पादनांच्या उत्पादक कंपन्या भारतात सातत्याने आपले प्लांट उभे करत आहेत. फॉक्सकॉन कंपनीने तर तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता Apple भारतातील आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे.

Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे. २० एप्रिल पासून ग्राहक सकाळी १० वाजल्यानंतर या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच Apple चे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा थर्ड पार्टी स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित

हेही वाचा : Apple वापरकर्त्यांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी सुरु होणार भारतातील पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर

भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. मुंबईमधील रिटेल स्टोअरचे लॉन्चिंग १८ एप्रिल रोजी होणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. याबाबतचे वृत्त Economic Times या वृत्तसंस्थेने दिले आहे.

डेटा अ‍ॅनालिटिक फर्म CRE मॅट्रिक्स द्वारे अ‍ॅक्सेस केलेल्या करारानुसार आणि इकॉनॉमिक टाइम्सने मूल्यांकन केल्यानुसार, २२ ब्रँड हे Apple च्या रिटेल स्टोअरजवळ त्यांचे शॉप्स उघडू शक्त नाहीत. तसेच त्यांची जाहिरात देखील करू शकत नाहीत. Amazon, Facebook, Google, LG, Microsoft, Sony, Twitter, Bose, Dell, Devialet, Foxconn, Garmin, Hitachi, HP, HTC, IBM, Intel, Lenovo, Nest, Panasonic आणि Toshiba इत्यादी ब्रँड Apple रिटेल स्टोअर ज्या ठिकाणी लॉन्च होईल तिथे आपले शॉप्स उघडू शकणार नाहीत. 

हेही वाचा : मुंबईतील Apple रिटेल स्टोअरजवळ ‘या’ २२ दिग्गज ब्रँड्सना आपली दुकाने उघडता येणार नाहीत, जाणून घ्या कारण

Apple चे जगभरात ५०० पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्स आहेत. आता कंपनी भारतातही दोन अधिकृत स्टोअर उघडणार आहेत. ग्राहकांना स्टोअरमध्ये अनेक ऑफर्स आणि उत्कृष्ट अनुभव मिळण्याची शक्यता आहे. Apple स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अ‍ॅपल जीनियस या नावाने ओळखले जाणार आहे.