Asus 8Z भारतात लाँच करण्यात आला असून ७ मार्चपासून उपलब्ध होणार आहे.. 8Z हा स्मार्टफोन रिब्रँडेड Zenfone 8 आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात लाँच होणार होता. मात्र करोनामुळे लाँचिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. अखेर २८ फेब्रुवारीला हा फोन लाँच करण्यात आला आहे. Asus 8Z ची भारतातील किंमत ४२,९९९ रुपये आहे आणि ती ७ मार्चपासून उपलब्ध होईल. या फोनमद्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिप आहे. Asusने विशिष्ट मोबाईल वापरकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा फोन लाँच केला आहे. कॉम्पॅक्ट अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

Asus 8Z ला ग्लास बॅक आहे. हा कॉर्निंग गोरिला ग्लास ३ आहे. बाजू मेटलच्या बनलेल्या आहेत, तर पुढच्या बाजूला तुम्हाला कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस मिळेल. अधिकृत IP68 रेटिंगसह येणारा 8Z हा पहिला Asus फोन आहे. हा फोन ८.९ मिमी आणि वजन फक्त १६९ ग्रॅम आहे. या फोनमध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेट आणि ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडरसह ५.९ इंचाचा सॅमसंग निर्मित HDR10+ रेडी E4 AMOLED डिस्प्ले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिप असून ८ जीबी LPDDR5 रॅम आणि १२८ जीबीपर्यंत UFS3.1 स्टोरेजसह जोडलेलं आहे. यात स्टोरेज वाढवता येणार नाही. हे सॉफ्टवेअर Android 11 आहे ज्यामध्ये Asus चे Zen UI आहे. फोटोग्राफीसाठी, Asus 8Z च्या मागील बाजूस एकूण दोन कॅमेरे आहे. एक ६४ एमपी मुख्य (Sony IMX686/f/1.8 OIS) आणि दुसरा १२ एमपी सोनी IMX363 सेन्सर f/2.2 ऍपर्चर लेन्सच्या मागे (म्हणजे ते मॅक्रो म्हणून दुप्पट होऊ शकते) ऑटोफोकस देखील आहे, . 8Z 8K रेकॉर्डिंग (@24fps) करण्यास सक्षम आहे. समोर १२ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. फोनला ३० वॅट फास्ट वायर्ड चार्जिंगसह ४ हजार एमएएच बॅटरी आहे. या पॅकेजमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर, हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.२, NFC आणि Wi-Fi 6E आहेत.

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Asus 8Z ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह फोनची किंमत ४२,९९९ रुपये आहे. ७ मार्चपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. 8Z जागतिक स्तरावर ५९९ युरो (सुमारे ५०,५०० रुपये) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ऑब्सिडियन ब्लॅक आणि होरायझन सिल्व्हर या दोन रंगात फोन उपलब्ध आहे.