दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेल आणि मायक्रोसॉफ्टने भागीदारी केली आहे. या भागीदारीनंतर आता मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या माध्यमातून फोन कॉलची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकारच्या कॉलिंगला इंटिग्रेटेड कॉलिंग म्हणतात. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील ओव्हर-द-टॉप प्लेयर मोबाईल आणि लँडलाइन वापरकर्त्यांना जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एअरटेल आयक्यूचे बिझनेस हेड, अभिषेक बिस्वाल यांनी निवेदनात म्हटले आहे की, दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेल आणि मायक्रोसॉफ्टने भागीदारी केली. एक मजबूत आणि नाविन्यपूर्ण समाधान वितरीत करण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी करताना आनंदी असल्याचे ते म्हणाले. मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानासह एअरटेलची कनेक्टिव्हिटीची ताकद सर्व ग्राहकांसाठी विश्वासार्हता, खर्च बचत, सुलभ व्यवस्थापन आणि सर्वसमावेशक उपाय सुनिश्चित करेल, ज्यामुळे त्यांना त्यांचे कार्य वाढविण्यास मदत होईल आणि आगामी काळात त्यांची उत्पादकता सुधारण्यास मदत होईल. आता पुढे जाऊन केवळ उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करू, असे ते म्हणाले.
(हे ही वाचा : Apple Diwali Sale: iPhone 15, iPad, MacBook वर मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा डिस्काउंट, खरेदीसाठी लागल्या रांगा )
तर दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टच्या भारत आणि दक्षिण आशियाच्या हेड, श्रुती भाटिया म्हणाल्या, ” Airtel सोबत भागीदारी करताना आणि एक नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करताना आम्हीही आनंदी आहोत. ही भागीदारी भारतीय कर्मचार्यांना उत्पादकता, सहयोग आणि कार्यक्षमतेचे नवीन स्तर गाठण्यास मदत करेल आणि देशातील कामाचे भविष्य बदलेल.” असे त्यांनी नमूद केले.