scorecardresearch

iPhone 14 pro max की Galaxy S23 Ultra; फीचर्स, कॅमेरा, बॅटरी यात कोणता स्मार्टफोन ठरेल तुमच्यासाठी सर्वाेत्तम? पाहा एकदा

आपण आज Galaxy S23 Ultra आणि iPhone 14 pro max यांच्यातील कोणता फोन चांगला ते जाणून घेऊयात.

Comparison of iPhone 14 pro max And samsung galaxy s23ultra
iPhone 14 pro max And samsung galaxy s23ultra / लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Samsung ने काल झालेल्या unpacked इव्हेंटमध्ये Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus या स्मार्टफोन्ससोबतच Galaxy S23 Ultra चे लाँचिंग केले आहे. हा सॅमसंगचा प्रीमियम आणि महागडा स्मार्टफोन असणार आहे. Apple कंपनीच्या आयफोनशी तुलना करण्यासाठी सॅमसंगचे वापरकर्ते नक्कीच उत्साही असतील. तर आपण आज Galaxy S23 Ultra आणि iPhone 14 pro max यांच्यातील कोणता फोन चांगला ते जाणून घेऊयात.

Galaxy S23 Ultra व iPhone 14 pro max चा कॅमेरा

आयफोन १४ प्रो मॅक्स याचा कॅमेरा हा ४८ मेगापिक्सलचा असून यात २ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड आणि १२ मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असलेले कॅमेरा आहे. आयफोन १४ प्रो मॅक्स या फोनला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो.

सॅमसंग गॅलॅक्सी अल्ट्रा एस २३ या स्मार्टफोनचा कॅमेरा हा २०० मेगापिक्सल कॅमेरा आहे. यामध्ये १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड आणि १० मेगापिक्सल टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. सॅमसंग अल्ट्रा एस २३ या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा देखील १२ मेगापिक्सलचा आहे .

iPhone 14 Pro Max च्या तुलनेत Samsung Galaxy S23 Ultra च्या वापरकर्त्यांना कॅमेराच्या खूप उच्च रिझोल्यूशनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळणार आहे.

हेही वाचा : जबरदस्त फीचर्ससह लाँच झाले Samsung Galaxy Book 3 सिरीजमधील ‘हे’ लॅपटॉप्स; जाणून घ्या किंमत

आयफोन १४ प्रो मॅक्समध्ये iOS 16 ही ऑपरेटिंग सिस्टीम असून ती १६.३ पर्यंत अपग्रेड करता येते. तर या गॅलॅक्सी अल्ट्रा एस २३ स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १३ वर आधारित Samsung One UI 5.1 ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना वापरायला मिळते.

डिस्प्ले

Galaxy S23 Ultra या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग कंपनी iPhone 14 Pro Max पेक्षा जास्त शार्प डिस्प्ले देत आहे. आयफोन १४ प्रो मॅक्स मध्ये ६.७ इंचाचा १२९० x२७९६ इतके पिक्सलचा डिस्प्ले तर गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रा मध्ये ६.८ इंचाचा १४४० x ३०८८ पिक्सलचा डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळणार आहे.

Battery

आयफोन १४ प्रो मॅक्समध्ये ४,३२४ mAh क्षमतेची बॅटरी येते. तर, गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रामध्ये ५,०००mAh क्षमतेची बॅटरी येते. मात्र हे सांगणे कठीण आहे की डिव्हाइस हँड-ऑन टेस्टशिवाय जास्त काळ चालू शकेल.

हेही वाचा : Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नवीन डिझाइनसह झाले लाँच; सर्व काही सविस्तर जाणून घ्या

आयफोन १४ प्रो मॅक्सचा Apple A16 Bionic हा प्रोसेसर आहे. तसेच गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 हा प्रोसेसर आहे. आयफोन १४ प्रो मॅक्स या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८, २५६, ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेले मॉडेल्स येतात. याचे स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येते. Galaxy S23 Ultra यामध्ये ८ व १२ जीबी रॅम आणि २५६व ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. याचेही स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येते.

Galaxy S23 Ultra व iPhone 14 pro max ची किंमत ?

iPhone 14 pro max या फोनची किंमत ही १,३९,९०० रुपये इतकी आहे. Galaxy S23 Ultra ची किंमत Galaxy S23 Ultra या फोनची किंमत $११९९ (सुमारे ९८,३०० रूपये ) असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 11:35 IST
ताज्या बातम्या