BSNL 365 Days Recharge Plan : बीएसएनएलची होळी धमाका ऑफर ३१ मार्च २०२५ रोजी म्हणजेच अवघ्या १० दिवसांत संपणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडने होळी धमाका ऑफरचा एक भाग म्हणून दोन परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये अतिरिक्त वैधतेची जोड दिली आहे. त्यामुळे युजर्स कमीत कमी किमतीत ३६५ दिवसांची वैधता अनुभवू शकणार आहेत. म्हणजेच कंपनीने पूर्वीच्या ३३६ दिवसांच्या प्लॅनच्या वैधतेत अतिरिक्त २९ दिवसांची वाढ केली आहे, ज्यामुळे युजर्स त्यांचे सिम संपूर्ण वर्षभर ॲक्टिव्ह ठेवू शकतात. चला तर, बीएसएनएलच्या या परवडणाऱ्या रिचार्ज पर्यायावर एक नजर टाकूया.

कमी किमतीत ३६५ दिवसांचा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) :

बीएसएनएलचा हा व्हॅल्यू पॅक्ड रिचार्ज प्लॅन प्रीपेड असणार आहे आणि त्यासाठी ग्राहकांना फक्त एक हजार ४९९ रुपये मोजावे लागणार आहे. सुरुवातीला या प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता होती. पण, होळी धमाका ऑफरमुळे युजर्सना या रिचार्ज प्लॅनमध्ये अतिरिक्त २९ दिवस दिले जाणार आहेत. या वाढीव वैधतेसह या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत राष्ट्रीय रोमिंगसह अनेक फायदेसुद्धा मिळणार आहेत. त्याबरोबरच दररोज १०० मोफत एसएमएस, २४ जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. खाली दिलेल्या पोस्टवर बीएसएनएलने त्यांच्या एक्स (ट्विटर) हँडलद्वारे या ऑफरची शेवटची तारीख कळवली आहे आणि स्पष्ट केले आहे की, ३१ मार्च २०२५ नंतर हे फायदे उपलब्ध राहणार नाहीत.

https://twitter.com/BSNLCorporate/status/1902259000760267199

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीएसएनएल होळी धमाका ऑफर (Holi Dhamaka offer)

बीएसएनएल त्यांच्या दोन हजार ३९९ रुपयांच्या प्लॅनसह युजर्ससाठी ऑफर आणखी वाढवत आहे, ज्यामध्ये पूर्वी ३९५ दिवसांची वैधता होती. आता होळी ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना ४२५ दिवसांची वैधता दिली जाईल. या प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अमर्यादित कॉलिंग, मोफत राष्ट्रीय रोमिंग, दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा आणि १०० मोफत एसएमएससुद्धा दिले जातील. या प्लॅनमध्ये वापरकर्ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ३० अतिरिक्त दिवसांची वैधतादेखील मिळवू शकतात.