BSNL ने एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉंच केला आहे जो भरपूर डेटा आणि इतर अनलिमिटेड बेनिफीट्स ऑफर करतो. ग्राहकांना महिन्याला एकूण ७५ GB डेटा मिळत आहे. नवीन प्लॅन ३०० दिवसांसाठी वैध असेल, ज्याचा मुळात अर्थ असा आहे की प्लॅन सुमारे ९-१० महिन्यांसाठी वैध असेल. हा एक लॉंग टर्म प्लॅन आहे ज्याची किंमत २०२२ रुपये आहे. इथे आम्ही तुम्हाला या प्लॅनच्या सर्व फायद्यांबद्दल तपशीलवार सांगत आहोत.

BSNL चा २०२२ रूपयांचा प्रीपेड प्लॅन
BSNL ने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्रीपेड प्लॅन जोडला आहे, ज्याची किंमत २०२२ रुपये आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये दर महिन्याला ७५ GB डेटा दिला जातो. पण हा डेटा केवळ ६० दिवसांसाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर यूजर्सना डेटा व्हाउचर खरेदी करावे लागतील. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अस्तित्वात असलेला डेटा प्लॅन संपवला की, स्पीड ४० Kbps पर्यंत खाली येईल.

आणखी वाचा : तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुमचे Whatsapp Chat वाचू शकणार नाही, ही ट्रिक वापरा!

लोकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग तसंच दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळतो. आझादी का अमृत महोत्सव PV_2022 चा एक भाग म्हणून BSNL ने हा नवीन प्रीपेड पॅक लॉंच केला आहे. परंतु, ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे आणि ३१ ऑगस्टपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असेल.

आणखी वाचा : Airtel चा जबरदस्त प्लॅन! ४९९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉल, ७५ GB डेटा, प्राइम व्हिडीओ आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शन फ्री

इतर अलीकडे लाँच केलेले BSNL प्रीपेड प्लॅन्स
याशिवाय, कंपनीने नुकताच BSNL STV 228 प्रीपेड प्लॅन लॉंच केला आहे. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग दिले आहेत. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅननमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो. हाय स्पीड लिमिट संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड डेटा ८० Kbps पर्यंत कमी होईल. दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

BSNL ची २३९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील आहे ज्यात १० रुपयांचा टॉकटाइम तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळत आहे. ग्राहकांना दररोज २ GB डेटा आणि दररोज १०० SMS देखील मिळतात. मागील प्रीपेड प्लॅनप्रमाणे प्रदान केलेला सर्व डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा वेग ८० Kbps पर्यंत कमी केला जाईल.