Coca-Cola News: कोका-कोला कोल्ड्रिंकचे नाव तुम्ही ऐकले असेलच. हे कोल्ड्रिंक तुम्ही प्यायले ही असेल. बाजारामध्ये लहान दुकानांपासून मोठ्या मॉलमध्ये या कंपनीचे कोल्ड्रिंक मिळते. आता हीच कंपनी टेक क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कोका-कोला कंपनी लवकरच आपला स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात या वर्षी लाँच होणार आहे. यासाठी कोका-कोला कंपनीने एका स्मार्टफोन ब्रँडसोबत भागीदारी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही भागीदारी कोणत्या मोबाइल ब्रँडसोबत आहे याबाबत कोणतीही माहिती नाही.

एका रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन Realme 10 4G कोका-कोला या नावाने लाँच करण्यात येईल. याचे फीचर्स जवळजवळ Realme च्या फोन सारखे असतील. या फोन रिअलमी १० ४जी सारखा MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि ARM G57 MC2 GPU ग्राफिक्स येणार आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
RBI Monetary Policy Meeting 2024 Repo Rate Unchanged Marathi News
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा!
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
Coca-Cola SmartPhone (Image Credt-Scoail Media)

काय आहेत फीचर्स ?

टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या मते , कोका-कोला कंपनीच्या या फोनचा फर्स्ट लुक सुद्धा समोर आला आहे. ज्यामध्ये फोनचे डिझाईन कसे आहे ते दिसत आहे. यामध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी डिप्सले येऊ शकतो. तसेच हा फोनचा रंग लाल असणार आहे. एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप यामध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहे. तसेच यात १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो. ३३ वॅटचे SuperVOOC फास्ट चार्जिंग येते. तसेच या फोनची बॅटरी ५०००mAh क्षमतेची असणार आहे.