Digilocker will be pre installed in android : शासकीय, महाविद्यालीन दस्तऐवज ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिलॉकर स्टोअरेज सेवेचा वापर केला जातो. डिजिलॉकर अ‍ॅप उपलब्ध असून ते डाऊनलोड करून त्यात तुम्ही कागदपत्रे ठेवू शकता. परंतु, भविष्यात अँड्रॉइडमधील फाइल अ‍ॅपमध्ये डिजिलॉकर सेवा उपलब्ध करणार, अशी घोषणा गुगलने सोमवारी गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये केली आहे.

नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजनसह भागीदारीसह गुगलला लोकांना सरकराने जारी केलेली कागदपत्रे जसे पॅन, पासपोर्ट, आधार किंवा इतर कोणतीही कागदपत्रे सहजरित्या स्मार्टफोनमधून वापरू द्यायची आहेत. शेकडो फायलींमध्ये ओळखपत्र शोधण्यासाठी जो वेळ जातो तो वाचवणे हा या सहयोगामागचा विचार आहे.

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
BOI Officer Recruitment 2024
BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

(Photo Quality सुधारायची आहे? मग वापरा ‘या’ AI वेबसाइट्स, व्हिडिओतील बॅकग्राउंडही हटवू शकता)

फाइल्स अ‍ॅप वापरकर्त्याचे सरकारी दस्तऐवज ओळखण्यास सक्षम असेल आणि त्यांना एका सुरक्षित फोल्डरमध्ये संघटित करेल, असे गुगलने सांगितले. अल्गोरिदम फाइल्स अ‍ॅपमध्ये ठेवलेल्या डॉक्युमेंट्समधून युजरचा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड डेटा ओळखण्यासाठी सक्षम असेल, असे गुगलने स्पष्ट केले आहे.

गुगलद्वारे फाइल्समध्ये संग्रहित केलेले दस्तऐवज डिव्हाइसवर एका वेगळ्या वातावरणात असतील आणि केवळ एका युनिक लॉकस्क्रिन ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यात प्रवेश मिळवता येईल, असे म्हटले जाते. याचा अर्थ केवळ युजर सोडून इतर कोणालाही दस्तऐवज वापरता येणार नाही.

(Linkedin Account कायमचे किंवा तात्पुर्ते बंद करायचे आहे? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

अँड्रॉइड फोन्सवर डिजिलॉकर कधी उपलब्ध होईल, याबाबत गुगलने खुलासा केला नाही, त्याचबरोबर आयओएसबरोबर सहकार्याशी संबंधित तपशीलही उघड केलेला नाही. डिजीलॉकरने मार्च 2022 पर्यंत 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे.

अँड्रॉइडसोबत डिजिलॉकरच्या भागीदारीने युजरला सुरक्षितरित्या त्यांची दस्तऐवज सहजरित्या वापरता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आणि एनईजीडीचे सीईओ अभिषेक सिंह यांनी म्हटले.