अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक सोशल मीडिया व्यासपीठ सुरु केलं आहे. या सोशल मीडिया अ‍ॅपचं नाव Truth Social असं ठेवण्यात आलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ट्विटरपेक्षा अधिक मनमोकळेपणाने लोकं आपली बाजू मांडू शकतील, असा दावा करण्यात आला आहे. मात्र या अ‍ॅपचा चुकीचा वापर करणाऱ्या काही युजर्जंना प्रतिबंधित करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे हजारो युजर्स या अ‍ॅपवर खातं उघडण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. ट्रम्पच्या ट्रुथ सोशल अ‍ॅपमध्ये प्लॅटफॉर्मवर काय पोस्ट केले जाऊ शकते, या संदर्भात अधिक कठोर नियम असल्याचे दिसते. जर नियंत्रकांना काही सामग्री खोटी, बदनामीकारक किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांवर बंदी घालू शकतात. जे लोक ट्रुथ सोशल अ‍ॅप वापरत आहेत त्यांना आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बंदी किंवा निलंबित केले जाऊ शकते. ट्रुथ सोशल अ‍ॅप सध्या यूएसमध्ये राहणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. हे Android वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध नाही.

मॅट ओर्टेगा नावाच्या युजरला युजरनेमच्या आधारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अ‍ॅपवरून बॅन करण्यात आले होते. Mashable च्या अहवालानुसार, खाते @DevineNunesCow या वापरकर्तानावाने तयार केले गेले होते, ज्याचा वापर माजी रिपब्लिकन डेव्हिन नुनेस यांची खिल्ली उडवण्यासाठी विडंबन ट्विटर खात्याद्वारे देखील केला गेला होता, ज्यांनी काही काळापूर्वी काँग्रेस सोडली होती आणि आता ते ट्रुथ सोशलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ओर्टेगाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक ईमेल प्राप्त झाला ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “तुमच्या @DevineDunesCow खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर खात्याद्वारे मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघना होत असल्याने तुमचे खाते कायमचे प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे.”

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?
pro bjp surrogate ads run on meta
आचारसंहिता जाहीर होताच स्वतंत्र जाहिरातदारांकडून सोशल मीडियावर भाजपाच्या समर्थनार्थ जाहिराती; ८५ लाख रुपये खर्च

Google Maps चं जबरदस्त फिचर! इंटरनेट नसतानाही दाखवेल मार्ग, जाणून घ्या कसं

अनेक वापरकर्त्यांना आधीच अ‍ॅपवर साइन-अप करण्यास समस्या येत आहेत. तर लाखो वापरकर्ते प्रतीक्षा यादीत आहेत. Engadget ने नोंदवले की, प्रतीक्षा यादीमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांना या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते तयार करू शकले नाहीत, त्यांनीही Apple च्या अ‍ॅप स्टोअरवर ५-स्टार रेटिंग दिले आहे. सध्या, ट्रूथ सोशल मीडिया अ‍ॅपला ४.१ स्टार रेटिंग आहे. हे फिचर्स बाबतीत Twitter सारखेच आहे आणि राजकीय भेदभावापासून मुक्त असलेले व्यासपीठ असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, ट्विटरने यापूर्वी कोविड-१९ आणि निवडणुकीच्या खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली आहे. पण वापरकर्त्यांवर बंदी घातली नाही. ‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्यावर ६ जानेवारी २०२१ रोजी ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला आणि निषेध केल्यानंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर हिंसा भडकावणारे संदेश पोस्ट केल्याचा आरोप होता.