scorecardresearch

Premium

Flipkart Big Year End Sale 2023: उद्यापासून सुरू होणार ‘इयर एण्ड सेल!’ स्वस्तात खरेदी करा ‘या’ वस्तू; जाणून घ्या ऑफर्स

फ्लिपकार्ट कंपनीच्या इयर एण्ड सेलमध्ये काय खास असेल ते पाहू…

Flipkart Big Year End Sale 2023 announced Its starts on December nine
(फोटो सौजन्य: @Financial Express) उद्यापासून सुरू होणार 'इयर एण्ड सेल!'

फ्लिपकार्ट कंपनी वर्ष अखेरीस ग्राहकांसाठी एक खास सेल घेऊन आले आहेत. फ्लिपकार्टने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर “बिग इयर एण्ड सेल”ची ( Big Year End Sale 2023) घोषणा केली आहे. हा सेल उद्यापासून म्हणजेच ९ डिसेंबरपासून सुरू होईल ते १६ डिसेंबरपर्यंत याचा कालावधी असेल. पण, ज्या ग्राहकांकडे फ्लिपकार्ट प्लसचे सदस्यत्व आहे ते एक दिवस आधी म्हणजेच आजपासून सेलमधील काही डील्स ॲक्सेस करू शकणार आहेत. फ्लिपकार्ट कंपनीच्या या खास सेलमध्ये काय खास असेल ते पाहू…

स्मार्टफोन :

Vi Company Offers Free Swiggy One Membership For Six Months On Some Max Postpaid Plans
Vodafone-Idea च्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार एक वर्षाची मोफत मेंबरशिप; जाणून घ्या ऑफर्स…
Zomato Payments Pvt Ltd has been granted permission by RBI to operate an online payment transaction system License economic new
झोमॅटोचा फूड ॲग्रीगेटर ते पेमेंट ॲग्रीगेटरपर्यंत प्रवास; ‘झोमॅटो पे’ला रिझर्व्ह बँकेकडून मान्यता
100 percent cashless treatment in hospitals
आरोग्य विमा क्षेत्रासाठी रुग्णालयांत १०० टक्के ‘कॅशलेस’ उपचाराची पद्धत गेमचेंजर ठरणार; ‘या’ गोष्टी जाणून घ्या…
Siggi a company is offering $10000 if you can stay off your phone for a month here's how to apply
महिनाभर मोबाईल फोनशिवाय राहून दाखवा आणि कमवा ८ लाख रुपये; ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर

आयफोन १४ (iPhone 14), पिक्सेल ७ (Pixel 7), मोटो जी ५४ फायजी (Moto G54 5G), रिअलमी सी ५३, (Realme C53), सॅमसंग गॅलॅक्सी एफ १५ फायजी (Samsung Galaxy F14 5G), पोको एम ६ प्रो फायजी (Poco M6 Pro 5G), मोटोरोला एज ४० निओ (Motorola Edge 40 Neo), सॅमसंग गॅलॅक्सी एस २१ एफई फायजी २०२३ (Samsung Galaxy S21 FE 5G (2023) ), विवो टी २ (Vivo T2) या सारखे लोकप्रिय स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या यादीनुसार सवलतीच्या दरात सेलमध्ये विक्रीसाठी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मच्या टीझरनुसार बिग इयर एण्ड सेलमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी एस २२ ची (Samsung Galaxy S22) किंमत ४० हजार रुपयांपेक्षा कमी असेल. सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन सध्या ४९,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपल्बध आहे, याचा अर्थ ग्राहकांना या सेलमध्ये मोठी सूट मिळणार आहे. तसेच आयफोन १४ ( iPhone 14) सध्या १२८ जीबी (128GB) स्टोरेज मॉडेलसाठी ६०,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा…गुगल अकाउंट डिलीट कसे करायचे असा प्रश्न पडलाय? या सोप्या स्टेप्स लक्षात ठेवा, पाहा

टीव्ही, गिझर, लॅपटॉप :

फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोन व्यतिरिक्त टीव्ही आणि विविध उपकरणांवर ७५ टक्के सूट दिली जाणार आहे. आता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून फ्लिपकार्ट कंपनी गिझर उपकरणांवर ७० टक्के सूट देत आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीजवरही ५० ते ८० टक्क्यांची सूट असेल. तसेच या सेलमध्ये ९,९९० रुपये किमतीपर्यंत तुम्ही लॅपटॉप खरेदी करू शकणार आहात. हा लॅपटॉप अगदीच बेसिक असेल. लॅपटॉपच्या किमतीत काही बँक रिलेटेड एक्सचेंज ऑफर असतील. तसेच ज्या ग्राहकांकडे फ्लिपकार्ट प्लसचे सदस्यत्व आहे, त्यांना या सेलसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यांना आजपासून सेलचा अनुभव घेता येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flipkart big year end sale 2023 announced its starts on december nine asp

First published on: 08-12-2023 at 13:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×