शुक्रवारी Microsoft Windows मध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे जगभरातील व्यवहार कोलमडले होते. यामुळे अनेक देशातील दैनंदिन कार्यालयीन कामकाज, बँका, विमान सेवा, शेअर बाजार, वित्तीय संस्था यासह अनेक व्यवहार ठप्प झाले होते. शनिवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असले तरी अब्जावधी ड़ॉलर्सचा फटका जगभरात बसला आहे. हा नेमका आकडा किती हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

असं असलं तरी नेमक्या किती संस्थांना फटका बसला होता याचे स्पष्टीकरण आता मायक्रोसॉफ्टने ब्लॉगच्या माध्यमातून दिलेलं आहे. CrowdStrike या सायबर सिक्युरिटी कंपनीच्या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये समस्या निर्माण झाल्याचा परिणाम हा जगातील तब्बल ८५ लाख Windows उपकरणांवर झाला असल्याचं मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे. विशेष म्हणजे हा आकडा एकूण वापरकर्त्यांच्या एक टक्के आहे असा दावाही कंपनीने केला आहे. ही टक्केवारी लहान असली तरी याचा परिणाम मोठा आहे, यावरुन हे दिसून येते की जगातील अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये CrowdStrike चा वापर केला जातो. मायक्रोसॉफ्टने असंही म्हंटलं आहे की आम्ही २४ तास काम करत अशा समस्येवर आणि पुढील अपडेटवर काम करत आहोत.

हे ही वाचा… करोना साथीत २०२० या एका वर्षात भारतात तब्बल ११ लाख ९० हजार मृत्यू ? केंद्राने दावा फेटाळला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वापरकर्ते, ग्राहक यांना उद्भवणाऱ्या समस्येकडे आम्ही लक्ष देत असून त्यांची व्यवस्था सुरळीत सुरु रहाण्याला प्राधान्य देत असल्याचंही मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलं आहे.