कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात. याच Google चा यंदाचा वार्षिक इव्हेंट हा Google I/O मे २०२३ या महिन्यात होणार असून गुगलने याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.Google चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Google Pixel 7a लॉन्च होण्याआधीच त्याच्या किंमती लीक झाली आहे. ग्राहकांना याबद्दल खूप उत्सुकता आहे आणि आता किंमती समोर आल्यानंतर त्यांच्यामध्ये आणखीनच क्रेझ पाहायला मिळत आहे.

Google Pixel 7a हा स्मार्टफोन १० मे रोजी जगभरामध्ये लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन Google I/O 2023 इव्हेंटमध्ये लॉन्च केले जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये ११ मे ल सादर केला जाणार आहे. हा फोन तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

हेही वाचा : VIDEO: ‘या’ दिवशी होणार Google चा सर्वात मोठा इव्हेंट, Android 14 सह लॉन्च होणार…; जाणून घ्या

Google Pixel 7a  चे फीचर्स

Google Pixel 7a च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये वापरकर्त्यांना Tensor G2 प्रोसेसरसह ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले ऑफर केले जाऊ शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका असू शकतो. इतकेच नव्हे तर ग्राहकांना यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये प्रायमरी हा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. त्याशिवाय १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड लेन्स आणि सेल्फी व व्हिडिओसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Google Pixel 7a हा स्मार्टफोन १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये खास गोष्ट अशी आहे या फोनचे डिझाईन हे Pixel 7 आणि Pixel 7 प्रो सारखेच ठेवण्यात आले आहे. कंपनीं हा फोन चार रंगांमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ChatGpt वरील हिस्ट्री डिलीट करायची आहे ? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

किंमत

Google चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Google Pixel 7a लॉन्च होण्याआधीच त्याच्या किंमती लीक झाली आहे. Google Pixel 7a लाँच करण्यापूर्वी, एक रिटेल बॉक्स प्रत्यक्षात सिंगापूरमधील एका रिटेलरकडे आला होता आणि त्याच रिटेलरने तो सर्वांसोबत शेअर केला आहे. Google Pixel 7a ची किंमत Pixel 6a पेक्षा जास्त आहे. माहितीनुसार, कंपनीने Google Pixel 7a ची किंमत ७४९ सिंगापूर डॉलर्स ठेवली असून ज्याची किंमत भारतामध्ये ४६,००० रुपये असण्याची शक्यता आहे.