Netflix Subscribers Drop : कंपनीने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचा खुलासा केल्यानंतर मंगळवारी नेटफ्लिक्सच्या समभागांनी त्यांचे मूल्य एक चतुर्थांश गमावले. आघाडीच्या स्ट्रीमिंग टेलिव्हिजन सेवेचे सदस्य कमी होण्याची ही दशकभरातील पहिलीच वेळ आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या तिमाही कमाईच्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीच्या ग्राहक संख्येत २ लाख ग्राहकांची घट झाली आहे.

दरम्यान, मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियातील सेवा निलंबित केल्याबद्दल कंपनीने क्वार्टर-ओव्हर-क्वार्टर इरोझेनला दोष दिला. नेटफ्लिक्सने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा शेवट २२१.६ दशलक्ष सदस्यांसह केला. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत ही संख्या किंचित कमी आहे.

नेटफ्लिक्स आणखी स्वस्त होणार? कंपनीनं दिले संकेत

सिलिकॉन व्हॅली टेक फर्मने नुकत्याच संपलेल्या तिमाहीत १.६ अब्ज डॉलर निव्वळ उत्पन्न नोंदवले, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत १.७ अब्ज डॉलर होते. कमाईचे आकडे जाहीर झाल्यानंतर, मार्केट ट्रेडिंगमध्ये नेटफ्लिक्सचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरून २६२ डॉलर्सवर आले आहेत.

नेटफ्लिक्सने एका पत्रात म्हटले आहे की, ‘आम्ही पाहिजे तितक्या वेगाने महसूल वाढवत नाही आहोत. २०२० मध्ये कोविडच्या काळात आम्हाला खूप फायदा झाला. परंतु २०२१ मध्ये फारसा फायदा झाला नाही.’

अ‍ॅपलने आपल्या नव्या अपडेटमध्ये समाविष्ट केली ‘प्रेग्नेंट मॅन’ इमोजी; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

नेटफ्लिक्सचा अंदाज आहे की सुमारे २२२ दशलक्ष उपभोक्ते त्यांच्या सेवेसाठी पैसे देत असतानाच, इतर १०० दशलक्षांहून अधिक अकाउंट्स इतरांसोबत शेअर करण्यात आले आहेत जे टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सेवेसाठी पैसे देत नाहीत.