व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत व्हॉटसअ‍ॅप वापरत असतो. व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग, कॉलिंग, व्हिडीओ कॉल, फोटो-व्हिडीओ शेअर करता येणे असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणतीही मीडिया फाईल शेअर करायची असेल तर सर्वात आधी व्हॉटसअ‍ॅप हा पर्याय डोळ्यासमोर येतो. पण यावर शेअर करण्यात आलेले व्हिडीओ, फोटो, जीआयएफ (GIF) ऑफलाईन कसे सेव्ह करायचे हे अनेकजणांना माहित नसते. व्हॉटसअ‍ॅपवर मीडिया आणि डेटा सेव्ह करण्यासाठी गूगल ड्राईव्ह आणि आयफोनसाठी ‘आय क्लाऊड’ हे बॅकअप पर्याय उपलब्ध आहेत. पण यांचा वापर न करताही फोनमध्ये डेटा बॅकअप घेता येतो. यासाठी काही सोप्या स्टेप्स वापराव्या लागतात. जाणून घ्या या सोप्या स्टेप्स.

या स्टेप्स वापरून करा व्हॉटसअ‍ॅप मीडिया ऑफलाईन सेव्ह

WhatsApp without internet allowed to send photos and files on Other Users Similar to apps like ShareIt
विना इंटरनेट करा फोटो,व्हिडीओ शेअर; ‘या’ ॲपमध्ये मिळणार सोय
olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी
  • फोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप मीडिया कुठे सेव्ह होत आहे ते तपासा, यासाठी इंटर्नल स्टोरेज > अँड्रॉइड मीडिया > व्हॉटसअ‍ॅप > मीडिया हे पर्याय निवडा.
  • त्यामध्ये तुम्हाला व्हॉटसअ‍ॅप जीआयएफ, व्हॉटसअ‍ॅप ऑडिओ, व्हॉटसअ‍ॅप व्हिडीओ, व्हॉटसअ‍ॅप फोटो असे काही सब फोल्डर्स दिसतील.
  • त्यानंतर यापैकी ज्या फोल्डरचे बॅकअप हवे आहे ते डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर कॉपी करा.
  • तिथून ते फ्लॅश ड्राइव्ह किंवा एक्स्टर्नल ड्राईव्हवर ट्रान्सफर करता येतील.
  • जर तुम्हाला व्हॉटसअ‍ॅपवरील सर्व मीडियाचा बॅकअप हवा असेल तर सर्व फोल्डर कॉपी करा.