scorecardresearch

PAN CARD Update: पॅन कार्ड हरवलं आहे? आता काही मिनिटांत ई-पॅन करा डाउनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुमचे पॅन कार्ड कुठेतरी हरवलं असेल तर तुम्ही आयकराच्या नवीन वेबसाइटवरून तुमचे ई-पॅन कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता.

पॅनकार्ड हे अत्यावश्यक कागदपत्र बनले आहे. (photo credit: file photo)

पॅनकार्ड हे अत्यावश्यक कागदपत्र बनले आहे. आजकाल सरकारी ते खाजगी काम करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य झाले आहे. बँकेत खाते उघडायचे असो, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घ्या किंवा आयटीआर फाइल करा, पॅन कार्ड सर्वत्र अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत तुमचे पॅन कार्ड कुठेतरी हरवलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही आयकराच्या नवीन वेबसाइटवरून तुमचे ई-पॅन कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता. ई-पॅन कार्डची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.

पॅन-आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य आहे

लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल किंवा तुमचा गोंधळ असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या मदतीने ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. मात्र यासाठी तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुमचा पॅन आणि आधार लिंक नसेल तर तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकणार नाही.

पॅन क्रमांकासह ई-पॅन कसे डाउनलोड करावे?

सर्वप्रथम आयकर वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉग इन करा.

आता ‘इन्स्टंट ई पॅन’ वर क्लिक करा.

पुढे, ‘New E PAN’ वर क्लिक करा.

आता तुम्ही तुमचा पॅन क्रमांक टाका.

तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल, तर तुमचा आधार क्रमांक टाका.

येथे अनेक नियम आणि अटी दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचा नंतर ‘Accept’ वर क्लिक करा.

आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो लिहा.

आता दिलेले तपशील वाचल्यानंतर ‘Confirm’ करा.

आता तुमचा पॅन तुमच्या ईमेल आयडीवर PDF फॉरमॅटमध्ये पाठवला जाईल.

येथून तुम्ही तुमचा ‘ई-पॅन’ डाउनलोड करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If you lost pan card then download e pan in 5 minutes from this website see here process scsm