अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. अ‍ॅमेझॉन ही एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे. खरेदीदार या वेबसाइटवरून आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्समध्ये खरेदी करू शकणार आहेत. ज्या ग्राहकांकडे प्राइम सबस्क्रिप्शन आहे ७ तारखेपासूनच सुरुवात झाली आहे. जर का तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये काही फोन्सचा विचार तुम्ही करू शकता. जे २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. तर तुम्हाला २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणकोणते स्मार्टफोन्स खरेदी करता येऊ शकतात हे जाणून घेऊयात.

iQOO Z7 Pro

iQOO कंपनीने भारतामध्ये आपला Z7 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनप्रमाणेच हा फोन गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. तसेच यात नवीन ड्युअल कॅमेरा सेटअप येतो.  या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा Aura लाइट OIS कॅमेरा मिळणार आहे. तसेच १२० Hz AMOLED डिस्प्लेसह येणार हा फोन वजनाला खूप जाड नसून, हा फोन AG ग्लास फिनिशसह येतो. फोनमध्ये आऊट ऑफ बॉक्सिंग अँड्रॉइड १३ वर आधारित फनटच OS १३ देण्यात आला आहे. iQOO Z7 Pro मध्ये ३.० रॅम देण्यात आली आहे. जी वापरकर्त्यांना ८ जीबी व्हर्च्युअल रॅम ऑफर करते. या नवीन स्मार्टफोनमध्ये १.०७ अब्ज रंगाच्या सपोर्टसह ६.७८ इंचाचा AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तसेच सुरक्षेसाठी यात Schott Xensation UP ग्लास मिळणार आहे.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…, ऑफर्स एकदा पाहाच

Poco F5 5G

पोको कंपनीने आपला मिड रेंज बजेटमधील Poco F5 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनला गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. Poco F5 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ड्युअल सिम सपोर्ट मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. डिस्प्ले DCI-P3 कलर गॅमट, डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सपोर्टसह १०० टक्के कव्हरेजसह येतो. स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण देखील देण्यात आले आहे. फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कँमेरा मिळतो. तर ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि तिसरा हा २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरासेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Lava Agni 2 5G

जे वापरकर्ते चांगला डिस्प्ले असणारा स्मार्टफोन शोधत असतील तर Lava अग्नी २ ५ जी फोनचा विचार करू शकता. हा फोन तुम्हाला या सेलमध्ये २५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. यामध्ये मिडियाटेक डायमेन्शन ७०५० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. याच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. यामधील ६.७८ इंचाचा AMOLED डिस्प्ले येतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ५० मेगापिक्सलच्या क्वाड कॅमेरा सेटअपसह येतो. यात ६६ W चार्जिंगच्या सपोर्टसह ४७०० mAh क्षमतेची बॅटरी मिळते.

हेही वाचा : AMOLED डिस्प्ले आणि २५६ जीबी स्टोरेजसह भारतात लॉन्च झाला Lava चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, किंमत फक्त…

Realme 11 Pro+ 5G

रिअलमी ११ प्रो ++ ५ जी स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता. रिअलमीचा हा प्रीमियम मिड रेंज स्मार्टफोन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ज्याची किंमत २५ हजारांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये मिडियाटेक डायमेन्शन ७०५० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये AMOLED डिस्प्ले आणि १०० W च्या फास्ट चार्जिंगसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह २०० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळतो.