iQOO ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स बाजारपेठेमध्ये लॉन्च करतच असते. त्यात ग्राहकांना नवीन फीचर्स आणि अपडेट्स मिळत असतात. iQOO कंपनीने भारतामध्ये आपला Z7 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनप्रमाणेच हा फोन गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. तसेच यात नवीन ड्युअल कॅमेरा सेटअप येतो. चला तर iQOO मग च्या Z7 Pro या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स, बॅटरी, कॅमेरा आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Z7 Pro हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७२०० ५जी च्या स्पोर्टसह येतो. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा Aura लाइट OIS कॅमेरा मिळणार आहे. तसेच १२० Hz AMOLED डिस्प्लेसह येणार हा फोन वजनाला खूप जाड नसून, हा फोन AG ग्लास फिनिशसह येतो. फोनमध्ये आऊट ऑफ बॉक्सिंग अँड्रॉइड १३ वर आधारित फनटच OS १३ देण्यात आला आहे. iQOO Z7 Pro मध्ये ३.० रॅम देण्यात आली आहे. जी वापरकर्त्यांना ८ जीबी व्हर्च्युअल रॅम ऑफर करते. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला आपला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; केवळ ८ मिनिटांमध्ये होणार…, ऑफर्स एकदा बघाच

या नवीन स्मार्टफोनमध्ये १.०७ अब्ज रंगाच्या सपोर्टसह ६.७८ इंचाचा AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तसेच सुरक्षेसाठी यात Schott Xensation UP ग्लास मिळणार आहे.

किंमत आणि उपलब्धता

नवीन iQOO Z7 Pro हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला असून, याचा पहिला सेल ५ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजता Amazon.in आणि iQOO.com वर हा सेल सुरू होणार आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रूपये आहे. तर २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑफर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा फोन SBI किंवा HDFC बँकेच्या कारधारकांना iQOO Z7 Pro या फोनवर २ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच तुम्ही तुमचा स्मार्टफोन एक्सचेंज केला तर कंपनी तुम्हाला २ हजारांचा एक्सचेंज बोनस देखील देणार आहे.