itel ने सोमवारी आपला नवा कोरा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन A23S भारतात लॉंच केला. #TarakkiKaSathi हॅशटॅगसह कंपनीने आपला नवीन बजेट फोन ६००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिला आहे. Itel स्वस्त किमतीत उत्तम हँडसेट लॉंच करण्यासाठी ओळखली जाते. itel मधील हा नवीन फोन सर्व बेसिक फीचर्ससह मिळतोय आणि दैनंदिन कामांसाठी योग्य आहे. हा फोन 4G तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. आम्ही तुम्हाला itel A23S ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल सर्व काही सांगणार आहोत.

itel A23S Price in India
itel A23S कंपनीने स्काय सायन, स्काय ब्लॅक आणि ओशन ब्लू अशा ३ वेगवेगळ्या कलरमध्ये उपलब्ध करून दिले आहे. फोनच्या खरेदीवर कंपनी वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर करत आहे, म्हणजेच खरेदीच्या १०० दिवसांच्या आत स्क्रीन तुटल्यास, ग्राहकांना ते विनामूल्य बदलता येईल. itel A23S स्मार्टफोन ५,२९९ रुपयांना खरेदी करता येईल.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
How To Use Quick Share feature on Android to quickly send files without an active internet connection
दोन फोनमध्ये करा Quick Share; ॲप अन् इंटरनेटचीही गरज नाही, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

आणखी वाचा : Samsung Galaxy M13, Galaxy M13 5G ची विक्री सुरू, प्राइम डे २०२२ सेलमध्ये किंमत ११,९९९ रुपयांपासून सुरू

itel A23S Specifications
Itel A23S स्मार्टफोनमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ५ इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ३०२० mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोनला २५ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम मिळेल. हँडसेट स्मार्ट फेस अनलॉक फीचरसह येतो. itel चा हा फोन ड्युअल 4G VoLTE कनेक्टिव्हिटीसह येतो.

आणखी वाचा : स्वस्तात मिळत आहेत Moto G51, Moto G60 आणि Moto G71 स्मार्टफोन, Flipkart Big Saving Days वर उत्तम ऑफर

Itel A23s स्मार्टफोन १५ वेगवेगळ्या भाषांना सपोर्ट करतो. इंग्रजी व्यतिरिक्त, हँडसेटमध्ये हिंदी, गुजराती, तेलगू, मल्याळम इत्यादी १४ भारतीय भाषा समर्थित आहेत. Itel ने फोनमध्ये एक नवीन सोशल टर्बो फीचर दिले आहे, ज्याबद्दल कंपनी म्हणते की यूजर्स WhatsApp कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्टेटस सेव्ह करू शकतील.

Itel A23S स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे. फोन १.४ GHz क्वाड-कोर SC9832E प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हँडसेटची परिमाणे १४५.४ ×७३.५×१०.५ mm आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.