scorecardresearch

जिओचे २०० रुपयांखालील प्लान्स पाहिलेत का? UNLIMITED CALLS, इंटरनेटसह मिळतंय बरच काही, पाहा यादी

कमी खर्चात कॉलिंग आणि इंटरनेटचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी जिओकडे २०० रुपयांच्या आत काही प्लान्स उपलब्ध आहेत.

जिओचे २०० रुपयांखालील प्लान्स पाहिलेत का? UNLIMITED CALLS, इंटरनेटसह मिळतंय बरच काही, पाहा यादी
(प्रातिनिधिक फोटो)

Jio plans under 200 rupees : जिओच्या ताफ्यात अनेक बजेट प्लान्स उपलब्ध आहेत. कमी खर्चात कॉलिंग आणि इंटरनेटचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी जिओकडे २०० रुपयांच्या आत काही प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग मिळते. कोणते आहेत हे प्लान्स? जाणून घेऊया.

१) १९९ रुपयांचा प्लान

या प्लानची व्हॅलिडिटी १४ दिवसांची असून त्यातून अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये ग्राहकाला १४ दिवसांपर्यंत १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच ग्राहकांना जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमा सारख्या अन्य जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

(सादर झाला INFINIX ZERO 5G 2023; 8 जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत)

२) १४९ रुपयांचा प्लान

जियोच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २० दिवसांची व्हलिडिटी मिळते. या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात. तसेच ग्राहकांना जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमा सारख्या अन्य जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

३) १५५ रुपयांचा प्लान

१५५ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, २ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यावरही लोकल आणि एसटीडी कॉल सुरू राहील.

(अमेझॉनवर बजेट इअरबड्स उपलब्ध, किंमत १ हजारांच्या आत, १० तासांपेक्षा अधिक प्लेटाईम, पाहा यादी)

४) १७९ रुपयांचा प्लान

१७९ रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी २४ दिवस असून त्यातून तुम्हाला रोज १ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. त्याचबरोबर, ग्राहकांना जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमा सारख्या अन्य जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 17:54 IST

संबंधित बातम्या