ChatGPT बाबत सध्या खूपच चर्चा रंगत आहे. यूएस-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी जोश डॉट एआई व्हॉइस-नियंत्रित होम ऑटोमेशन सिस्टम विकसित करण्यासाठी ओळखली जाते, कंपनीने OpenAI च्या ChatGPT वापरून प्रोटोटाइप एकत्रीकरणावर काम सुरू केले आहे. नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणजे अॅलेक्सा (Alexa). अॅलेक्सा Play Song, अॅलेक्सा आजच्या हवामानाविषयी माहिती दे, अशा सर्व इच्छा पूर्ण करणारी अॅलेक्सा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. परंतु आता अॅलेक्सासारखचं तुमचेही कमांड आता ChatGPT ही स्वीकारणार आहे.
जोश डॉट ई होम ऑटोमेशन सिस्टमचे सह-संस्थापक एलेक्स केपसेलाट्रो यांच्या मते, नवीन AI भाषा मॉडेल्सद्वारे समर्थित व्हॉइस असिस्टंटची ही क्षमता आहे. जोश डॉट एआई आणि ChatGPT सोबत काम करून खरोखरच एक उल्लेखनीय समाधान आणण्यासाठी उत्साहित आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
(हे ही वाचा : मोबाईल नेटवर्क नाही? तरीही, व्हिडीओ कॉल अन् करा चॅटिंग, ‘या’ स्मार्टफोनमध्ये युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स )
याशिवाय, ChatGPT-सक्षम व्हॉइस असिस्टंट कसे कार्य करेल, याची काही उदाहरणे केपसेलाट्रोने दिली आहेत.