TRAI New Rule Change From 1 December 2024: तुम्ही रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया (VI) किंवा बीएसएनएलचं सिम कार्ड वापरताय का? जर होय, तर डिसेंबरपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून सिम वापरकर्त्यांसाठी काही बदल केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी समस्या वाढू शकतात.

१ डिसेंबरपासून मोबाइल नंबरवर ओटीपी येणं होणार बंद?

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम ऑपरेटर्सना व्यावसायिक संदेशासाठी ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्यासाठी १ नोव्हेंबरची मुदत दिली होती, पण ही मुदत वाढवून आता १ डिसेंबर करण्यात आली आहे. या नियमात OTP बाबतही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ट्रायने स्कॅम आणि फिशिंग अॅक्टिव्हिटी रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या सुधारित मुदतीनुसार, ट्रेसेबिलिटी नियमाचे पालन न करणारे मेसेज आता १ नोव्हेंरच्या आधीच्या मुदतीऐवजी १ डिसेंबरपासून ब्लॉक केले जातील.

दरम्यान, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया (VI) सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी ट्रेसेबिलिटी नियमांचे पालन न करणारे मेसेज ब्लॉक करण्याच्या संभाव्य अडचणींवर चिंता व्यक्त केली आहे. अनेक बँकांसह अनेक टेलिमार्केटर्स आणि बिझनेसेस या गोष्टींसाठी पूर्णपणे तयार नाहीत, अशी भूमिका मांडत आहेत.

सर्वांची चिंता कमी करण्यासाठी ट्रायने ग्रेज्युअल इम्प्लिमेंटेशन प्रोसेसला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत ३० नोव्हेंबरपर्यंत नियमांचे पालन न करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना अलर्ट मेसेज पाठवला जाईल. तसेच १ डिसेंबरपासून नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्याचे मेसेज ब्लॉक केले जातील.

VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

ट्रायने उद्योग संस्थांना दिलेली ही दुसरी मुदतवाढ आहे. यापूर्वी URL आणि OTT लिंक्स असलेल्या मेसेजेसना व्हाइटलिस्ट करण्याची अंतिम मुदत १ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर लोकांना OTP मिळवणे कठीण होऊ शकते, परंतु या निर्णयामुळे वाढते ऑनलाइन स्कॅम आणि फसवणूक टाळता येऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाइल नंबरवरील मेसेजद्वारे होणाऱ्या स्कॅमला आळा घालण्यासाठी आणि टेलिकॉम क्षेत्रातील सुरक्षा वाढवण्यासाठी ट्रायने आता नियमांचे पालन न करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करणे, मोबाइल नंबर डिस्कनेट करणे आणि टेलिमार्केटिंग कॉल्सना ब्लॉकचेन बेस्ड प्लॅटफॉर्मवर मायग्रेट करणे अशा गोष्टींचा यात समावेश आहे.