व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आपल्या ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही यापुढे तुमचा नेटफ्लिक्स पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत पूर्वीसारखा सहज शेअर करू शकणार नाही. आता याची किंमत मोजावी लागेल. एका रिपोर्टनुसार, कंपनी आता नेटफ्लिक्स वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणार आहे. त्याची किंमत त्या वापरकर्त्यांना द्यावी लागेल, जे वापरकर्ता नेटफ्लिक्स पासवर्ड त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि बाहेरील लोकांसह शेअर करतात. प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेंगहाई लाँग यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की पासवर्ड शेअर केल्याने आमच्या गुंतवणूकीच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.

कंपनीची योजना काय आहे?

माहितीनुसार, नेटफ्लिक्स चाचणी कालावधीत चिली, कोस्टा रिका आणि पेरू या तीन देशांमध्ये याची चाचणी करेल. दरम्यान, नेटफ्लिक्स या काळात नवीन खात्यांमध्ये किंवा प्राथमिक खात्यांमध्ये प्रोफाइल पाहण्याची क्षमता हस्तांतरित करण्याव्यतिरिक्त, सवलतीच्या दरात आपल्या पॅकेजमध्ये अधिक दर्शक जोडण्याचा पर्याय ऑफर करेल. चाचणीनंतरच कंपनी या दिशेने पुढील पावले उचलेल.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

भारतात योजना किंमत वाढणार नाही

नेटफ्लिक्सने अलीकडेच यूके आणि आयर्लंडसाठी त्‍याच्‍या सदस्‍यत्‍वाच्‍या किमतीही वाढवल्‍या आहेत. Ampere Analysis नुसार, व्हिडीओ स्ट्रीमिंग जायंटचे यूकेमध्ये सुमारे १४ दशलक्ष सदस्य आणि आयर्लंडमध्ये ६००,००० सदस्य आहेत. कंपनीने या देशांमधील किमती सध्या वाढवल्या आहेत. त्यामुळे भारतीय वापरकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण अजूनही भारतात पूर्वीप्रमाणेच नेटफ्लिक्स उपलब्ध असेल.

रशियामध्ये नेटफ्लिक्स सेवा निलंबित

रशियाविरुद्धच्या निर्बंधांच्या यादीत नेटफ्लिक्सचाही समावेश आहे. नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वी रशियामध्ये आपल्या लाइव्ह स्ट्रीमिंग सेवेवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. सध्या रशियामध्ये नेटफ्लिक्स बंद आहे.