नोकिया ब्रँड अंतर्गत परवाना मिळालेल्या एचएमडी ग्लोबलला स्मार्टफोन बाजारात फारसे यश मिळाले नसावे . पण या फिनिश कंपनीने फीचर फोन मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे . नोकियाने आपला नवीन फीचर फोन Nokia 5710 XpressAudio भारतात लाँच केला आहे. नोकिया 5710 एक्सप्रेसऑडिओ चीनमध्ये आधीच लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला नवीन नोकिया फीचर फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल सर्व काही सांगणार आहोत…

नोकिया 5710 XpressAudio वैशिष्ट्ये

नोकिया 5710 एक्सप्रेस ऑडिओ फीचर फोन 4G VoLTE ला सपोर्ट करतो. युजरची गरज लक्षात घेऊन यामध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन फोनमध्ये रेट्रो डिझाइन आहे जे नोकियाच्या लोकप्रिय XpressMusic मालिकेची आठवण करून देते. HMD Global ने हा फोन खास बनवला आहे कारण या फोनसोबत वायरलेस इयरबड्स उपलब्ध आहेत, त्यानंतर हँडसेटच्या मागील पॅनलवर एक स्लाइडर कव्हरच्या आत आहे.

( हे ही वाचा: आता iPhone 13 आणि iPhone 12 कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; फक्त ‘या’ दिवसाची वाट पाहावी लागेल)

नोकियाच्या या नवीन फीचर फोनला उत्तम आवाजासह लाऊडस्पीकर देण्यात आला आहे. हँडसेटला उर्जा देण्यासाठी, १४५०mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे, जी अनेक आठवड्यांपर्यंत स्टँडबाय टाइम ऑफर करते. Nokia 5710 ExpressAudio वायरलेस इयरबड्सला सपोर्ट करतो, याचा अर्थ त्यात ब्लूटूथ ५.०सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन MP3 प्लेयर आणि FM रेडिओ सह येतो.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Nokia 5710 ExpressAudio मध्ये २.४ इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. हा हँडसेट Unisoc T107 चिपसेट सह येतो. फोनमध्ये स्क्रीनच्या उजव्या आणि डाव्या बाजूला संगीत नियंत्रित करण्यासाठी बटणे देण्यात आली आहेत. या फीचर फोनमध्ये डिस्प्लेच्या खाली क्लासिक T9 कीबोर्ड आढळतो. मागील बाजूस बोलायचे झाले तर फोनमध्ये LED फ्लॅशसह ०.३ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

( हे ही वाचा: मोबाईल तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे? ‘हा’ कोड वापरा आणि लगेच जाणून घ्या)

Nokia 5710 XpressAudio ची भारतात किंमत

Nokia 5710 ExpressAudio भारतात ४,९९९ रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. फीचर फोनची विक्री नोकियाच्या वेबसाइटवर १९ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होईल. याशिवाय, हँडसेट देशभरातील प्रमुख किरकोळ स्टोअर्स आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये विकला जाईल.

Story img Loader