एकेकाळी फोन बाजारावर नोकियाचे वर्चस्व पाहायला मिळत असे. आता पुन्हा एकदा कंपनी आपल्या फोन्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी सध्या आपल्या एका नवीन फोनवर काम करत असून नोकियाने आपला नवीन हँडसेट ‘Nokia G60 5G’ भारतात सादर करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये डिवाइसचा बॅक पॅनल दिसत आहे. मात्र, या ट्विटवरून फोनच्या लॉन्चिंगची तारीख किंवा किंमत स्पष्ट झालेली नाही.

Nokia G60 5G चे स्पेसिफिकेशन्स

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
New Era of Tv Samsung launch the world first glare free OLED Two TV with powerful AI features
AI फीचर्ससह सॅमसंगचे ‘हे’ दोन टीव्ही भारतात लाँच; सेटअप बॉक्स लावण्याचीही गरज नाही; किंमत फक्त…
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री

कंपनीने IFA 2022 इव्हेंट दरम्यान सप्टेंबरमध्ये Nokia G60 लाँच केला होता. Nokia G60 5G स्मार्टफोन Android १२ वर काम करतो आणि त्याला ड्युअल सिम सपोर्ट आहे. यात ६.५८-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन १,०८०×२,४०० पिक्सेल आहे, पीक ब्राइटनेस ५०० निट्स आहे आणि रिफ्रेश रेट १२०Hz आहे. त्याची स्क्रीन सुरक्षित ठेवण्यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ वापरण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

आणखी वाचा : पुढल्या महिन्यात लाँच होणार Realme 10 सीरिज; कंपनीची घोषणा, जाणून जबरदस्त फीचर्स…

Nokia G60 5G वैशिष्ट्ये
या मोबाईलमध्ये ४,५००mAh बॅटरी असून २०W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. फोनमध्ये अॅम्बियंट लाइट सेन्सरपासून फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकपर्यंत सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय हँडसेटमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे स्पेक्स दिले गेले आहेत. नोकियाचा हा हँडसेट ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये प्राथमिक सेन्सर ५० एमपीचा आहे. याशिवाय सेटअपमध्ये ५ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी ८ एमपी फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Nokia G60 5G किंमत
Nokia G60 5G स्मार्टफोनची भारतात किंमत २५,००० ते ३०,००० च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.