scorecardresearch

One plus चा नवीन स्मार्टफोन होणार लाँच; ‘हे’ असतील हटके फीचर्स

OnePlus Buds 2 Pro जर एकदा चार्ज केले तर ३२ तास युजर्स चार्जिंग न करता वापरू शकतात.

One plus चा नवीन स्मार्टफोन होणार लाँच; ‘हे’ असतील हटके फीचर्स
Image courtesy – The Indian Express

OnePlus 11 5G आता स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन २ अधिकृत आहे कारण चिनी बाजारपेठेत या फोनची घोषणा झाली आहे. वन प्लस ११ भारतामध्ये ७ फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. कंपनीने फ्लॅगशिप स्मार्टफोनसह OnePlus Buds Pro 2 earbuds चे अधिकृतपणे अनावरण केले आहे.

OnePlus 11 5G मध्ये OnePlus 10 Pro? च्या तुलनेत काय फरक आहे ?

या दोन जनरेशनमध्ये जो प्रमुख फरक आहे तो त्यांच्या डिझाईनमध्ये असून शकतो. one plus ११ ला स्टेनलेस स्टीलकॅमेरा मॉड्यूल आहे जो one plus मद्ये पहिल्यांदाच असणार आहे. vivo X८० प्रो सारखेच यालासुद्धा कॅमेरा मॉड्यूल हे गोल आकाराचे असणार आहे. OnePlus 11 ची ग्लास ही सँडविच डिझाईनची असणार आहे. मूलभूत वैशिष्ट्यांनुसार OnePlus मध्ये ६.७-इंचाचा २K रिझोल्यूशन १२०Hz AMOLED LTPO ३.० स्क्रीन आहे. या आधीच्या OnePlus 10 Pro मध्ये LTPO २.० पॅनेल होता. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ Gen २ प्रोसेसर युजर्सना मिळणार आहे.

one plus च्या या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आहे. ती बॅटरी मागच्या वर्षीच्या १० प्रो सारखीच असणार आहे. oneplus ने मागच्या सिरींजपेक्षा या सिरीजमध्ये चार्जिंग स्पीड वाढवला आहे. तो अनुक्रमे ८० वॅट वरून १००वॅट इतका करण्यात आला आहे.

हेही वाचा : नेटकऱ्यांना गुगलनं विचारलं नव वर्षात सर्वात आधी काय सर्च कराल? ‘ही’ भन्नाट उत्तरे ऐकून तुमचेही हसू आवरणार नाही

यामध्ये ५० एमपी सोनी IMX८९० कॅमेरा, ३२MP Sony IMX७०९ टेलिफोटो पोर्ट्रेट लेन्स, आणि ४८MP Sony IMX५८१ अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स असे फीचर्स मिळणार आहे. OnePlus ने OnePlus 10 Pro आणि OnePlus 10T स्मार्टफोन्ससह कॅमेऱ्यामध्ये मोठी सुधारणा केली आहे.

OnePlus Buds 2 Pro: वेगळपण काय ?

OnePlus Buds 2 Pro हे स्टिरिओ-ग्रेड ऑडिओ करण्यासाठी Dynaudio आणि MelodyBost ड्युअल ड्रायव्हरच्या सेटअपद्वारे सह-डिझाइन केले आहे. हे वायरलेस TWS-शैलीचे इयरफोन्स ११एमएम आणि 6एमएम ड्राइवर वापरतात ज्यामध्ये क्रिस्टल पॉलिमर डायफ्राम वेगळेअसते. हे एअरबड्स जलद आणि सहज गाणी ऐकण्यासाठी ब्लूटूथ ५.३ LE द्वारे संलग्न आहेत. OnePlus Buds 2 Pro जर एकदा चार्ज केले तर ३२ तास युजर्स चार्जिंग न करता वापरू शकतात.

OnePlus 11 5G, OnePlus Buds 2 Pro भारतात कधी होणार लाँच

चीनमध्ये ९ जानेवारीपासून OnePlus 11 5G आणि OnePlus Buds Pro 2 ची विक्री सुरु होणार आहे. OnePlus 11 मध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज आहे. या बेस मॉडेलची किंमत ३,९९९ युआन (रु. ४८,०९८) ,तर Buds Pro 2 ची किंमत आहे ८९९ युआन (रु. १०,१८२) . ७ फेब्रुवारी २०२३ ला भारतात लाँच झाल्यावर यांची किंमत काय असेल ते सांगता येत नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 15:50 IST

संबंधित बातम्या