OpenAI कंपनीने AI GPT 4 हे टूल लॉन्च केले आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, GPT 4 कंपनीच्या मागील GPT 3 आणि GPT 3.5 पेक्षा चांगली कामगिरी करेल. कंपनी म्हणते की GPT 4 हे एक मोठे मल्टीमोडल मॉडेल आहे . kR व्यवसाय आणि शैक्षणिक बेंचमार्कवर मानवी पातळीवरील कार्यप्रदर्शन दर्शवते. ज्यांच्याकडे सध्या चॅटजीपीटी प्लसचे सब्स्क्रिप्शन असलेले वापरकर्तेच या नवीन टूलचा वापर करून शकतात.ChatGPT अजूनही मजकूराद्वारे वापरकर्त्याच्या प्रश्नांना किंवा प्रश्नांना प्रतिसाद देते. तर नवीन सिरीज AI व्हिडीओ कंटेंट आणि चित्रपटांद्वारे प्रतिसाद देण्यास सक्षम असणार आहे. हे ChatGPT 4 मानव करतो तशीच ९ कामे करू शकतो. ही कामे कोणकोणती आहेत हे जाणून घेऊयात.

१.

GPT 3 समर्थित ChatGPT संभाषणात्मक पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी ओळखले जाते. OpenAI म्हणते की GPT 3.5 आणि GPT 4 मधील कामगिरीचा फरक हा जास्त असू शकतो. GPT 3 आणि GPT 3.5 पेक्षा GPT 4 ची रचना थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. ज्यामुळे ते आधी विश्वसार्ह आणि क्रिएटिव्ह वाटते.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
islamic information center marathi news, islam information
माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…

हेही वाचा : Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक

२.

GPT 4 ला इमेज इनपुट समजू शकते आणि Google Lens प्रमाणेच मजकूर आधारित माहिती देऊ शकतो. वापरकर्ते वस्तू ओळखण्यासाठी किंवा फोटोमधील मजकूर समजण्यासाठी फोटो अपलोड करू शकतात.हे फिचर अद्याप ChatGPT मध्ये उपलब्ध नाही. OpenAI ने या फीचरची क्षमता तपासण्यासाठी Be My Eyes सह यावर काम करत आहे.

३.

GPT 4 देखील GPT-3.5 आणि GPT-3 पेक्षा इतर भाषा चांगल्या प्रकारे समजू शकतो. GPT 4 API उपलब्ध झाल्यानंतर, भारतीय विकासक ते त्यांच्या टूल्समध्ये त्याचा समावेश करू शकतात. हे टूल्स अनेक भारतीयांना मदत करेल ज्यांना त्यांच्या मूळ भाषेत टायपिंग करायला आवडते.

४.

ओपनएआय म्हणते की जीपीटी 4 मागील जनरेशनपेक्षा अधिक क्रिएटिव्ह आणि सहयोगी आहे. हे टूल वापरकर्त्यांसोबत सर्जनशील आणि तांत्रिक लेखन यांचा कंटेंट म्हणजेचच गाणी लिहिणे, पटकथा लिहिणे किंवा वापरकर्त्याची लेखन शैली शिकणे तयार आणि एडिट करू शकते.

५.

ChatGPT बाबत लोकांमध्ये चिंतेची बाब देखील आहे की हे टूल गृहपाठ करण्यासाठी देखील मदत करू शकते. हेच कारण अनेक विद्यापीठांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. OpenAI म्हणते की GPT 4 परीक्षेमध्ये GPT-3 आणि GPT-3.5 च्या तुलनेत चांगली कामगिरी करू शकते.

हेही वाचा : Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक

६.

OpenAI सिस्टम मेसेजेस नावाचे नवीन API देखील लॉन्च करत आहे जेणेकरुन विकसक वापरकर्त्याचा अनुभव त्यांच्या इच्छेनुसार तयार करू शकणार आहेत.

७.

GPT 4 सामान्य मजकूर इनपुट व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकतो की नाही हे OpenAI ने अद्याप स्पष्ट केलेले नाही. यामध्ये महत्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टकडे अशी क्षमता असलेले टूल असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

८.

ईमेल आणि कॅलेंडरचे विश्लेषण करणे यामध्ये सुद्धा GPT 4 अत्यंत उपयोगी ठरू शकते. हे टूल अधिक प्रगत आभासी सहाय्यक म्हणून काम करू शकते. रोजचा अजेंडा तयार करण्यासाठी तसेच ईमेल आणि कॅलेंडरचे विश्लेषण करण्यासाठी वापरकर्ते GPT 4 टूलची मदत घेऊ शकतात.

Microsoft आणि OpenAI यांनी सध्या Bing Search मध्ये GPT-4 जोडेल जाईल की नाही याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही आहे.Bing GPT-3 आणि GPT-3.5 सह मायक्रोसॉफ्ट स्वतःचे प्रोमिथियस तंत्रज्ञान वापरते. यामुळे रिअल टाइम डेटा वापरून जलद प्रतिसाद दिला जातो. एआय न्यूरल नेटवर्कच्या मदतीने, चॅटजीपीटी वापरकर्त्याच्या प्रश्नाला मानवासारखा प्रतिसाद देते. सॅन फ्रान्सिस्को स्थित OpenAI ने नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटबॉट लाँच केले आणि तेव्हापासून ते खूप लोकप्रिय होत आहे.