गेल्या वर्षी ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. तसेच गुगल आणि मायक्रोसॉफ्टने देखील आपले चॅटबॉट लॉन्च केले आहेत. तसेच ओपनआयने iOS वापरकर्त्यांसाठी ChatGPT App लॉन्च केले आहे. आता लवकरच हे Android व्हर्जनवर लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. हे अ‍ॅप आधीपासूनच प्ले स्टोअरवर लिस्टेड करण्यात आले आहे. हे अ‍ॅप पुढील आठवड्यात अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल असे कंपनीने ट्विटरवर स्पष्ट केले आहे. वापरकर्ते Google Play Store वर प्री-ऑर्डर करू शकतात.

चॅटजीपीटीची कंपनी असलेल्या ओपनएआयने सोशल मीडियावर घोषणा केली की, याचे अँड्रॉइड व्हर्जन पुढील आठवड्यात लॉन्च करण्यात येईल. नेमक्या कोणत्या दिवशी हे लॉन्च होईल याबद्दल कंपनीने उल्लेख केलेला नाही. मात्र अ‍ॅप लॉन्च होताच तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर रजिस्ट्रेशन करू शकता. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

हेही वाचा : चॅटजीपीटी आणि बार्डला टक्कर देण्यासाठी Apple देखील लॉन्च करणार आपला AI चॅटबॉट?

ChatGPT हा एक उपयोगी चॅटबॉट आहे. जे तुमच्या प्रश्नची उत्तरे देऊ शकतो. तसेच तुमच्याशी संभाषण करू शकतो. सुरुवातीला हे अ‍ॅप iOS वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले होते. तेव्हापासून अँड्रॉइड वापरकर्ते याची आतुरतेने वाट बघ होते. चॅटजीपीटी आता मोबाइलवर वर उपलब्ध झाल्याने कदाचित गुगल बार्ड च्या चिंतेत वाढ होऊ शकते. कारण सध्या AI चॅटबॉटच्या स्पर्धेत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी याचा वापर सुरु करण्यात आला आहे. तसेच या स्पर्धेत अनेक कंपन्या उतरताना दिसून येत आहेत. बार्डकडे समर्पित मोबाइल अ‍ॅप उपलब्ध नाहीत. ते वेब आधारित इंटरफेसवर अवलंबून आहे. चॅटजीपीटी आत अँड्रॉइड वापरकर्त्यांकडे उपलब्ध होणार असल्याचे बार्डवर आपली क्षमता वाढवण्यासाठी दबाब येऊ शकतो.

जर का तुही ChatGPT च्या अँड्रॉइड अॅपची वाट पाहू शकत नसल्यास तुम्ही कदाचित आधीपासून उपलब्ध असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या Bing App चा विचार करू शकता. बिंग हे फेब्रुवारीपासून अँड्रॉइड आणि iOS वर उपलब्ध आहे. तथापि हे लक्षात घेण्यासारखे आहे की ChatGPT चे अँड्रॉइड रिलीज हे एका अशा टप्प्यावर आले आहे. Sensor Tower आणि Similarweb च्या अलीकडील आकडेवारीनुसार, जूनमध्ये वेब ट्रॅफिक आणि App इंस्टॉलेशन्समध्ये घट दर्शविली आहे. याव्यतिरिक्त, काही वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे की GPT-4 हे नवीन व्हर्जन हळू आणि कमी बुद्धिमान दिसते. ओपनएआयने वापरकर्त्यांकडून उपलब्ध झालेल्या तक्रारींवर असे सांगितले की ते App ची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सतत अपडेट्सवर काम करत आहेत.

हेही वाचा : Netflix चा मोठा निर्णय! आजपासून भारतात पासवर्ड शेअरिंग बंद, जाणून घ्या नेमका बदल…

अँड्रॉइड वापरकर्ते लवकरच त्यांच्या मोबाइलवर ChatGPT चा आनंद घेऊ शकणार आहेत. यामुळे गुगल बार्डला काही स्पर्धांना सामोरे जावे लागू शकते. ChatGPT च्या अँड्रॉइड रिलीझची वाट पाहत असताना, Microsoft च्या Bing सारखे इतर चॅटबॉट पर्याय उपलब्ध आहेत

Story img Loader