Oppo या स्मार्टफोन कंपनीची नवीन स्मार्टफोनची सिरीजचा Oppo Reno 8 भारतात विस्तार झाला आहे. कंपनीने आज (शुक्रवारी) या सिरीजमधील आणखी एक नवीन फोन Oppo Reno 8T 5G लॉन्च केला आहे. या फोनच्या किंमतीबद्दल , फीचर्सबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Oppo Reno 8T सिरीजचे फीचर्स

६.६७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले Oppo Reno 8T 5G या या स्मार्टफोन्समध्ये येतो. तसेच Octa Core 6nm Snapdragon 695 हा प्रोसेसर आणि ८ जीबी LPDDR4X रॅम येते. या फोनमध्ये रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा हा १०८ मेगापिक्सलचा येतो. बाकीचे दोन्ही कॅमेरे हे २ मेगापिक्सलचे येतात. तसेच व्हिडीओ कॉल्स आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सल कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता ४,८००mAh इतकी असून याला ६७ वॅटचे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?

हेही वाचा : Google Layoffs: गुगलच्या अडचणींमध्ये वाढ, कमी पगाराविरोधात कर्मचाऱ्यांनी उचलले ‘हे’ पाऊल

Oppo Reno 8T 5G ची किंमत

Oppo Reno 8T 5G है स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सनराइज गोल्ड अणि मिडनाईट ब्लॅक या दोन रागनमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज अशा सिंगल स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत भारतीय बाजारपेठेत २९,९९९ रुपये आहे. वापरकर्ते २९,९०० रुपयांना हा फोन खरेदी करू शकणार आहेत. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. प्री-ऑर्डर ही सेवा वापरकर्त्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.