scorecardresearch

Samsung Galaxy Z Flip ला टक्कर देण्यासाठी Oppo ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त फोल्डेबल स्मार्टफोन, दोन स्क्रीन आणि…

Oppo Find N2 Flip स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

Oppo Find N2 Flip launch in india
Oppo Find N2 Flip 4- संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Oppo कंपनीने Oppo Find N2 Flip हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारपेठेत लंडनमधील एका इव्हेंट दरम्यान लॉन्च केला होता. मात्र काळ हा जबरदस्त स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन सर्वप्रथम २०२२ मध्ये चीनमध्ये लॉन्च झाला होता. हा एक फोल्डेबल स्मार्टफोन आहे. याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीविषयी जाणून घेऊयात.

Oppo Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Find N2 Flip स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. तसेच स्क्रीनचा सॅम्पलिंग रेट २४०Hz आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित ColorOS 13.0 सह येतो. या फोल्डेबल फोनमध्ये Octa-core MediaTek Dimensity 9000+ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये Mali-G710 MC10 GPU ग्राफिक्स आणि ८ जीबी रॅम मिळते. तसेच वापरकर्त्यांना फोनमध्ये २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळणार आहे.

हेही वाचा : Oppo Find N2 Flip की Samsung Galaxy Z Flip4: जबरदस्त प्रोसेसर, बेस्ट कॅमेरा अन्; किंमत तर फक्त…

कनेक्टिव्हिटीसाठी, Oppo Find N2 Flip मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS/A-GPS, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे जबरदस्त फीचर्स मिळतात. फोनमध्ये एक्सलेरोमीटर, जायरोस्कोप, हॉल सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि जिओमॅग्नेटिक सेन्सर देण्यात आले आहेत. ओप्पोचे म्हणणे आहे की हा हँडसेट अंडर-स्क्रीन अ‍ॅम्बियंट लाइट सेन्सरसह येतो. फोनमध्ये अंडर-स्क्रीन कलर टेम्परेचर सेन्सर देखील आहे.

Oppo Find N2 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ४३००mAh ची ड्युअल सेल बॅटरी आहे जी ४४ W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. ओप्पो चे म्हणणे आहे की मोबाइलसह बॉक्समध्ये ८०W चा चार्जर उपलब्ध असणार आहे. तसेच सेफ्टी फीचर्समध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे फिचर देण्यात आले आहेत. या मोबाइलचे वजन सुमारे १९१ ग्रॅम इतके आहे.

हेही वाचा : Tech Layoff: आर्थिक मंदीचा मोठा फटका! ‘या’ दिग्गज टेक कंपनीमध्ये पुन्हा एकदा ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची होणार कपात

काय आहे किंमत ?

Oppo Find N2 Flip चा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंट भारतात ८९,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन तुम्ही Black आणि Purple या रंगांमध्ये खरेदी करू शकता. हा हँडसेट Flipkart, Oppo Store आणि ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ओप्पो कंपनीचा नवीन फोल्डेबल काही बँकाच्या कार्डवरून खरेदी केल्यास ५,००० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळू शकते. याशिवाय ओप्पोच्या स्मार्टफोनसोबत एक्सचेंज करण्यासाठी ५,००० रुपये एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 09:34 IST
ताज्या बातम्या