Smartphones Under 10000 : आजकाल प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो. आपण मोबाइल खरेदी करत असताना त्याचा कॅमेरा, फीचर्स , किंमत आणि स्पेसिफिकेशन्स कसे आहेत याची चौकशी करतो. प्रत्येक वापरकर्ता आपल्या गरजेनुसार जे फीचर्स आवश्यक असतात त्या प्रमाणे फोनची खरेदी करतो. आज आपण असे काही स्मार्टफोन पाहणार आहोत. ज्यात चांगले फीचर्स पण आहे नी त्याची किंमत पण कमी आहे. १० हजार रुपयांच्या आतमधील किंमतीचे स्मार्टफोन कोणकोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.

Realme Narzo N53

Realme Narzo N53 मध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. ब्राईटनेस ४५० नीट्स इतका आहे. हा स्मार्टफोन Octa Core Unisoc T612 SoC वर काम करतो. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. या फोनला ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. रिअलमीचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 काम करतो.

Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Lashkar e Taiba  Pakistani commander Usman killed in an encounter in an anti terror operation
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर
Apple CEO Tim Cook give diwali wishes with an photo of diyas clicked by an Indian photographer
भारतीय फोटोग्राफरने काढलेला सुंदर फोटो शेअर करत Appleचे सीईओ टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा, पोस्ट होतेय व्हायरल
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हेही वाचा : अँड्रॉइड युजर्ससाठी ‘या’ देशांमध्ये ChatGpt लॉन्च; भारताचा समावेश आहे का? वाचा संपूर्ण यादी

रिअलमीच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Realme Narzo N53 मध्ये ५०००mAh ची बॅटरी मिळते. ज्याला ३३ W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळते. Realme Narzo N53 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे.

Moto G13

Moto E13 या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १३ आणि Dual nanosim चा सपोर्ट देण्यात आला आहे. वापरकर्त्यांना या फोनमध्ये ६.५ इंचाचा HD Plus IPS LCD डिस्प्ले वापरायला मिळतो. यामध्ये ४ जीबी LPDDR4x रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते. तसेच फोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि मॅक्रो व डेप्थ साठी ड्युअल २ मेगापिक्सलची लेन्स यात मिळते. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनला १०W चार्जिंगसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ४. जीबीच्या व्हेरिएंटसाठी ९,४९९ आणि ४/१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.

Vivo Y02

Vivo Y02 या फोनचे वजन हे १८६ ग्रॅम इतके आहे. विवो Y02 मध्ये ६.५१ इंचाचा HD + डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळतो. तसेच यात मीडियाटेक ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. यात ३ जीबी रॅम देण्यात आली असून ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. जे १ टीबी पर्यंत वाढवता येते. एलईडी फ्लॅश आणि f/2.0 अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. १०W चार्जिंगसह याला ५००० mah ची बॅटरी देण्यात अली आहे. २/३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे.

हेही वाचा : Reliance Jio चे ‘हे’ आहेत पाच डेटा बूस्टर प्लॅन, किंमत १०० रूपयांपेक्षा आहे कमी

Redmi 10A

Redmi 10A या फोनचे वजन १९४ ग्रॅम इतके आहे. तसेच यात वापरकर्त्यांना वॉटरड्रॉपसह ६.३३ इंचाचा HD + डिस्प्ले मिळतो. हा फोन IMG PowerVR GE8320 GPU सह मीडियाटेक हेलीयो G25 प्रोसेसर द्वारा समर्थित आहे. यात ३ जीबी/ ४जीबी LPDDR4x रॅम आणि ३२/६४ जीबी eMMC 5.1 स्टोरेज बघायला मिळते. फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तसेच सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. १०W चार्जिंगसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच ३/३२ जीबी मॉडेलची किंमत ८,४९९ रुपये आहे. तर ६/६४ जीबी मॉडेलची किंमत ९,४९९ रुपये आहे.